Goa Board SSC results 2025 Dainik Gomantak
गोवा

Goa Board Results: दहावीच्या निकालाचा 'काउंटडाउन' सुरू; एप्रिलमध्येच लागणार निकाल

10th Results Goa: एप्रिल महिन्याच्या मधल्या काळात निकाल जारी केला जाईल अशी माहिती शालान्त मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी माध्यमांना दिली आहे

Akshata Chhatre

पणजी: इयत्ता बारावीच्या निकालानंतर आता दहावीचे विद्यार्थी देखील निकालाच्या प्रतीक्षेत आहेत आणि मिळालेल्या माहितीनुसार बारावी प्रमाणेच दहावीचा निकाल देखील यंदा लवकर जाहीर केला जाईल. एप्रिल महिन्याच्या मधल्या काळात निकाल जारी केला जाईल अशी माहिती शालान्त मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी माध्यमांना दिली आहे.

भगीरथ शेट्ये यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, यंदाच्यावर्षी १५ एप्रिल ते २० एप्रिल या काळात दहावीच्या विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. साधारणपणे बारावीच्या निकालांनंतर दहावीचा निकाल जाहीर होतो.

यंदा बारावीच्या अंतिम परीक्षा लवकर झाल्या आणि निकाल देखील जाहीर करण्यात आले आहेत आणि यानंतर आता दहावीच्या विद्यार्थ्यांचा देखील निकाल जाहीर होईल. बारावीचा निकाल लवकर जारी करता यावा म्हणून अधिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती.

मुलांना त्यांच्या पुढील शिक्षणाचा निर्णय घेण्यासाठी वेळ मिळावा आणि प्रवेश घेण्यासाठी देखील पुरेसा वेळ मिळावा म्हणून दहावीचा निकाल लवकर जाहीर करण्याचा विचार सुरु आहे. यंदा दहावीची परीक्षा १ मार्च ते २१ मार्चपर्यंत ३२ परीक्षा केंद्रांतून घेण्यात आली होती आणि या परीक्षेत एकूण १८,८७१ विद्यार्थी पहिल्याच वेळी परीक्षेसाठी बसले होते. यामध्ये ९,२९७ मुले, तर ९,५७४ मुलींचा समावेश होता. नवीन शिक्षण धोरणानुसार यंदाच्यावर्षी जून महिन्यात अकरावीचे वर्ग सुरु होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

SCROLL FOR NEXT