Goa Pollution Control Board: घनकचरा रोखण्यासाठी नियंत्रण मंडळाची 'खास योजना'! मोठ्या कंपन्यांना गावे दत्तक घेण्याचे आवाहन

Waste Management Special Plan by Control Board: घनकचरा प्रदूषण नियंत्रणात आणण्‍यासाठी दत्तक गाव योजना तयार केली आहे. त्‍याअंतर्गत मोठ्या कंपन्‍यांना गावे दत्तक घेण्‍याचे आवाहन प्रदूषण नियंत्रण मंडळाने केले आहे, अशी माहिती गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील यांनी दिली.
Garbage | Waste
Garbage | WasteCanva
Published on
Updated on

पणजी: घनकचरा प्रदूषण नियंत्रणात आणण्‍यासाठी दत्तक गाव योजना तयार केली आहे. त्‍याअंतर्गत मोठ्या कंपन्‍यांना गावे दत्तक घेण्‍याचे आवाहन प्रदूषण नियंत्रण मंडळाने केले आहे, अशी माहिती गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील यांनी दिली.

‘गोदरेज’ कंपनीने डिचोली, वाळपई भागातील ३० पंचायतींमध्‍ये कचरा व्‍यवस्‍थापनासाठी योगदान दिले आहे. बिस्‍लेरी, पारादीप फॉस्‍पेट अशा अनेक कंपन्‍यांनी कचरा व्‍यवस्‍थापनासाठी कोट्यवधींचा निधी देऊन गोवा घनकचरा व्‍यवस्‍थापनाला मदतीचा हात दिला आहे, अशी माहितीही पाटील यांनी दिली.

Garbage | Waste
LPG Price Hike In Goa: गॅस सिलिंडर महागला! पाच महिन्यांत झाली भरमसाठ वाढ; नवे दर जाणून घ्या

‘शून्‍य कार्बन’चे उद्दिष्ट

१. वायू प्रदूषणात वाढ होत आहे. त्‍याचे मापन करण्‍यासाठी राज्‍यात २२ ठिकाणी यंत्रणा उभारली आहे. त्‍या अंतर्गत कोणते घातक वायू कोणत्‍या कारणाने वाढतात, हे कळते. त्‍यानुसार कारवाई वा अन्‍य प्रकारे नियंत्रण आणले जात आहे.

२. ‘शून्‍य कार्बन’चे उद्दिष्ट बाळगले असून, त्‍याअंतर्गत अधिकाधिक इलेक्‍ट्रिक व्‍हेईकलवर भर देण्‍यासाठी जागृती करण्‍यात येत आहे. सरकारी खात्‍यांत अशा वाहनांना प्राधान्‍य देण्‍यात येत आहे.

३. पाण्‍याचा कमीत कमी वापर व्‍हावा, यासाठी औद्योगिक वसाहतींमध्‍ये वापरलेल्‍या पाण्‍यावर प्रक्रिया करून ते पुन्‍हा वापरात आणले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com