भाजपमध्ये (BJP) गेलेले आमदार तेथे राहण्यास इच्छूक नाहीत. ते आल्यामुळे भाजपचे मूळ कार्यकर्ते अस्वस्थ (upset) आहेत. Dainik Gomantak
गोवा

Goa: भाजपचे मूळ कार्यकर्ते अस्वस्थ; सुदिन ढवळीकर

दैनिक गोमन्तक

पणजी: भाजपमध्ये (BJP) गेलेले आमदार तेथे राहण्यास इच्छूक नाहीत. ते आल्यामुळे भाजपचे मूळ कार्यकर्ते अस्वस्थ (upset) आहेत. यामुळे येत्या निवडणुकीत भाजपच्या आमदारांची संख्या एक आकडी होईल, असे मगोचे आमदार सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) यांनी आज येथे सांगितले.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले, लोबोच काय, अनेकजण मला भेटले. राजकीय चर्चा झाली. अनंत चतुर्दशीनंतर राज्यातील राजकारणाचा एक वेगळाच चेहरा पाहायला मिळेल. लोबोच कशाला, सगळेच सरकारवर नाराज आहेत. विकास करवून घेऊ म्हणून भाजपमध्ये गेलेल्या आमदारांनी आपल्या मतदारसंघाचा कोणता विकास केला ते सांगावे. आम्ही सरकारमधून बाहेर पडल्यानंतर सरकारने एक तरी प्रकल्प मंजूर करवून आणला तर सांगावे. आज पाणी पुरवठ्याचे श्रेय मुख्यमंत्री घेत असले तरी त्या प्रकल्पांची सुरवात आणि मंजुरी माझ्या मंत्रिपदाच्या काळात झाली होती. मुख्यमंत्र्यांनी कुणाच्या तरी सांगण्यावरून टीका करण्यापेक्षा माहिती घेऊन बोलावे, असेही ढवळीकरांनी ठणकावले.

आपदग्रस्तांना मदत मंजुरीपत्रे देऊन बोळवण

सरकारने वादळग्रस्त, पूरग्रस्तांना अद्याप मदत दिलेली नाही. केवळ मदत मंजुरीची पत्रे दिली आहेत. त्यामुळे असंघटित क्षेत्रातील लोकांना प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे राज्यभरात १५० कोटी रुपये सरकार कसे देणार, हा प्रश्न आहे. अनेक सरकारी प्रकल्‍प अपूर्णावस्थेत आहेत. साखळीचे बसस्थानक पाच वर्षांत पूर्ण होऊ शकलेले नाही. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ, गोमेकॉतील विस्तारीत इमारतीचे बांधकाम, मेरशी येथील न्यायालय संकुल अपुरे आहे. मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्यावर टीका करताना आपण काचेच्या घरात राहातो हे लक्षात ठेवावे, असा इशारा त्यांनी दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

Margaon Municipality: बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करा; महेश अमोणकरांची मागणी

Mhadei Water Dispute: म्हादईवर वक्रदृष्टी कायम! कर्नाटक सरकारच्या 'करनाटकी वृत्ती'वर पर्यावरणप्रेमी केरकर स्पष्टच बोलले

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

SCROLL FOR NEXT