पत्रकार परिषदेत बोलताना सदानंद शेट तानावडे बाजूला बाबू कवळेकर, संजय वेळीप व सुचिता शिरवईकर. Dainik Gomantak
गोवा

Goa: केपेत भाजपाच जिंकून येईल - तानावडे

दैनिक गोमन्तक

केपे: कोविड (Covid-19) काळात केंद्र सरकारने लोकांसाठी जे कार्य केले आहे त्याला तोड नाही त्याचबरोबर राज्य सरकारने ही महामारी रोखण्यासाठी जे काम केले आहे ते लोकांनी पाहिले आहे व यासाठी हे सरकार खऱ्या अर्थाने लोकांचे आहे असे गोवा भाजपा प्रदेश्याध्यक्ष सदानंद शेट तानावडे (Goa BJP state president Sadanand Shet Tanawade) यांनी केपे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री तथा केपेचे आमदार बाबू कवळेकर, केपे मंडळ अध्यक्ष संजय वेळीप,नगराध्यक्षा सुचिता शिरवईकर,नगरसेवक प्रसाद फळदेसाई, अमोल काणेकर, अवेडेचे सरपंच अलेलूया अफोनसो, योगेश कुंकळकर, संदीप फळदेसाई व इतर मान्यवर हजर होते. सेवा ही संघटन हे या पक्ष्याचे कार्य असून कोविड महामारीत आमच्या कार्यकर्त्यांनी चांगले कार्य केले हे लोकांनी पाहिले आहे .केपेत या महामारीच्या काळात केपेचे आमदार बाबू कवळेकर यांनी सुसज्ज असे कोविड निगा केंद्र सुरू करून लोकांना चांगली सुविधा दिली पण याच्या विरोधात विरोधकांनी फक्त लोकांची दिशाभूल करण्यावाचून काहिच केले नाही असे तानावडे यांनी सांगितले.विधानसभा निवडणूक ही वेळेवरच होणार आहे.केपेतुन आता बाबू कवळेकर यांनी भाजपात प्रवेश केल्याने केपेत भाजपा मजबूत झाली आहे. गेल्या जिल्हा पंचायत व नगरपालिका निवडणुकीत भाजपने यश संपादन केले असल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या जोरावर भाजपा परत एकदा सत्तेवर येणार आल्याचे तानावडे यांनी सांगितले.

विरोधकांनी कितीही गाजावाजा केला तरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपा सरकारच सत्तेवर येणार असे उपमुख्यमंत्री तथा केपेचे आमदार बाबू कवळेकर यांनी सांगितले.भाजपने कोविडच्या महामारीच्या सुरवातीपासून लकासाठी झोकून दिले आहे पण आता कोणितरी लोकांना धान्य वाटपाचे काम करून लोकांची सहानभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याचे सांगून केपेतून भाजपा कमळ फुलवणार आहे असे कवळेकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT