Goa: 18 सार्वजनिक मंडळांचा 'दीड दिवस' गणेशोत्सव

गतवर्षीप्रमाणे यंदाही फक्त दीड दिवसाचा गणपती पूजनाचा प्रस्ताव जयंत जाधव यांनी मांडला. त्या प्रस्तावाला मंडळाच्या प्रतिनिधींनी संमती दिली.
मुरगावचे उपजिल्हाधिकारी दत्तराज देसाई यांनी येथील सार्वजनिक 18 गणेशोत्सव मंडळाच्या प्रतिनिधींची बैठक बोलाविली होती.
मुरगावचे उपजिल्हाधिकारी दत्तराज देसाई यांनी येथील सार्वजनिक 18 गणेशोत्सव मंडळाच्या प्रतिनिधींची बैठक बोलाविली होती. Dainik Gomantak

वास्को कोविडच्या (Covid19) पार्श्वभूमीवर येथील 18 सार्वजनिक गणेशोत्सव (Ganesh Utsav) मंडळांनी दीड दिवसाचा उत्सव साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. श्रीगणेश मूर्तीचे विसर्जन करतानाही कोविड मार्गदर्शक तत्त्वांचा योग्य अवलंब करण्याचा निर्धारही त्यांनी केला आहे. (Ganeshotsav in Goa is only one and a half days this year)

मुरगावचे उपजिल्हाधिकारी दत्तराज देसाई यांनी येथील सार्वजनिक 18 गणेशोत्सव मंडळाच्या प्रतिनिधींची बैठक बोलाविली होती. बुधवारी बायणा रवींद्र भवनामध्ये घेण्यात आलेल्या या बैठकीला रवींद्र भवनाचे अध्यक्ष जयंत जाधव कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाणा, नगराध्यक्ष दामोदर कासकर, नगरसेवक दीपक नाईक, नगरसेवक यतीन कामुर्लेकर, नगरसेवक दामोदर नाईक, मुरगावचे गटविकास अधिकारी प्रसिद्ध नाईक, पोलीस निरीक्षक नीलेश राणे, वास्को वाहतूक निरीक्षक सुदेश नार्वेकर उपस्थित होते. या बैठकीला पंचवीसपैकी 18 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या प्रतिनिधींनी उपस्थिती लावली.

मुरगावचे उपजिल्हाधिकारी दत्तराज देसाई यांनी येथील सार्वजनिक 18 गणेशोत्सव मंडळाच्या प्रतिनिधींची बैठक बोलाविली होती.
भुमीपुत्र विधेयकास माझा विरोध, मंत्री मायकल लोबो यांचा भाजपला घरचा आहेर 

गतवर्षीप्रमाणे यंदाही फक्त दीड दिवसाचा गणपती पूजनाचा प्रस्ताव जयंत जाधव यांनी मांडला. त्या प्रस्तावाला मंडळाच्या प्रतिनिधींनी संमती दिली. याप्रसंगी दीपक नार्वेकर, नीलेश राणे यांनीही आपले मत व्यक्त केले. बैठकीचा इतिवृत्तांत दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे उपजिल्हाधिकारी देसाई यांनी यावेळी सांगितले.

उत्सवाची नियमावली

• लहान आकाराचे मंडप उभारण्यात येतील.

आरतीवेळी मार्गदर्शक तत्त्वांचा योग्य पालन केले जाईल.

• गणेश विसर्जन सायंकाळी 6 ते रात्री 10 वेळेत करण्यात येईल.

• विसर्जन कार्यक्रमात फक्त पंधराजण सोबत असतील.

फोटो : बैठकीत उपस्थित आमदार एलिना साल्ढाणा, उपजिल्हाधिकारी दत्तराज देसाई, नगराध्यक्ष दामोदर कासकर, जयंत जाधव, प्रसिद्ध नाईक.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com