Sadanand Shet Tanavade  Dainik Gomantak
गोवा

Sadanand Shet Tanavade: संसदेच्या वाणिज्य स्थायी समिती सदस्यपदी सदानंद शेट तानावडे यांची निवड

Parliament's Standing Committee on Commerce: भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष व राज्यसभा सदस्य सदानंद शेट तानावडे यांची संसदेच्या वाणिज्य स्थायी समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष व राज्यसभा सदस्य सदानंद शेट तानावडे यांची संसदेच्या वाणिज्य स्थायी समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. ते पहिल्यांदाच राज्यसभेवर निवडून आले आहेत. डोला सेन या या समितीच्या अध्यक्षपदी असतील.

संसदेने आज विविध विषयांच्या स्थायी समितीच्या घोषणा केल्या. त्यात तानावडे यांना संधी दिली गेली आहे. पक्षाने ही जबाबदारी दिल्याबद्दल कर्जत दौऱ्यावर असलेल्या तानावडे यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, गोव्‍याचा मी राज्यसभेचा एकमेव सदस्य असूनही पक्षाने स्थायी समितीवर काम करण्याची संधी दिली आहे. या समितीच्या माध्यमातून राज्याच्या विकासासाठी जो काही हातभार लावणे शक्य आहे त्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे.

पक्षाचे संघटनात्मक काम आपल्यासाठी आपण नेहमीच प्राधान्य देतो. त्याशिवाय संसदेतही राज्याच्या संबंधित तसेच राष्ट्रीय पातळीवर विचार मांडण्याची संधी पक्षाने याआधी दिली आहे. संसदेच्या स्थायी समितीवर पहिल्याच निवडीवेळी काम करण्याची संधी मिळणे ही बाब निश्चितच आनंददायी आहे, असे त्यांनी नमूद केले.

भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक वाढीसाठी तसेच पक्षाच्या सदस्यत्व नोंदणीसाठी जोमात काम सुरू आहे. पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी आपण सक्षमपणे पेलण्याचा प्रयत्न करत असतो,असेही तानावडे यांनी सांगितले. पीर्ण गावचा पंचायत सदस्य या पदापासून ते राज्यसभा खासदारपदापर्यंत सर्व पदांवर कार्य करण्याची आणि जनसेवा करण्याची संधी पक्षाने दिली आहे,त्यामुळे आपण पक्ष नेतृत्वाचे आभार मानतो. तसेच दिलेल्या या जबाबदारीचे यथायोग्यपणे पालन करू,असेही तानावडे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

POP Ganesh Idol: गोव्यात प्लास्टर ऑफ पॅरिस गणेशमूर्तींच्या विक्रीवर कठोर बंदी घाला; हिंदू जनजागृती समितीची मागणी

Jitesh Sharma: लॉर्ड्समध्ये जितेश शर्माची 'फजिती'! 'या' खेळाडूमुळे मिळाली एन्ट्री, पाहा VIDEO!

Comunidade Land Goa: कोमुनिदादींच्या जमिनी केवळ गावकार व भागधारकांच्याच; हस्तक्षेप करण्याचा राज्य सरकारला अधिकार नाही

Viral Video: जगाला वेड लावणारा 'ऑरा फार्मर'! 11 वर्षांचं पोर बनलं सोशल मीडियावर स्टार; त्याचा अनोखा डान्स तुम्ही पाहिला का?

Nagpur Goa Highway: गोव्यात नेमके कोणते शक्तिपीठ? महामार्ग विरोधात रक्ताच्या अखेरच्या थेंबापर्यंत लढण्याचा राजू शेट्टींचा निर्धार

SCROLL FOR NEXT