Shripad Naik Dainik Gomantak
गोवा

Shripad Naik: भाजपच्या विकासाच्या कार्यपद्धतीमुळेच ‘इंडिया’तील अनेक पक्ष भाजपच्या संपर्कात

श्रीपाद नाईक ः गृहमंत्र्यांनी लोकसभेत विरोधकांना उघडे पाडले

गोमन्तक डिजिटल टीम

Shripad Naik भाजपच्या विकासाची कार्यपद्धत आणि भवितव्याचा विचार करून विरोधी पक्ष भाजपशी जोडला जात आहे. आम्ही त्यांना आणण्याचा प्रयत्न करीत नाहीत, असे गट आणि इंडिया गटातील पक्ष भाजपच्या संपर्कात असून लवकरच ते पक्षाशी जोडले जातील, असा दावा केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी केला.

देशातील आतंकवाद संपुष्टात करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे. मणिपूरमध्ये परकीय शक्तींनी आतंकवादी पाठवून दंगलीला खतपाणी घातले. हे आता स्पष्ट झाले आणि गृहमंत्र्यांनी लोकसभेत याची सविस्तर माहिती दिली आणि काँग्रेस तसेच विरोधकांना उघडे पाडले, असे श्रीपाद नाईक म्हणाले.

शुक्रवारी, म्हापसा येथे भाजपच्या जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे उत्तर गोवा मंडळाध्यक्ष महानंद अस्नोडकर, फ्रँकी कार्व्हालो व राजसिंग राणे हे उपस्थित होते.

सत्ता हेच काँग्रेसचे वैशिष्ट्य आहे. यामुळे हल्लीच झालेले लोकसभा आणि राज्यसभा अधिवेशनात मणिपूर दंगल प्रकरणावरून अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.

सभापतींनी मणिपूर विषयावर चर्चेची तयारी दाखवूनही पंतप्रधानांनीच वक्तव्य करावे, अशी दंडेलशाही आणि दादागिरीची मागणी विरोधकांनी केली आणि अधिवेशन चालवू न देण्याचा प्रयत्न केला.

यापूर्वी नऊवेळा मणिपूरमध्ये दोन जातींमध्ये जातीय दंगली झाल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसचे केंद्रीयमंत्री त्या ठिकाणी फिरकले नव्हते. यावेळी केंद्र सरकारचे राज्यमंत्री 23 दिवस मणिपूरमध्ये राहून परिस्थितीचा आढावा घेत होते.

तर गृहमंत्री अमित शहा यांनी तीनवेळा मणिपूर दौरा केला. तसेच पंतप्रधान दिल्लीत बसून दंगलीवर आळा घालण्यासाठी प्रयत्न करत होते, असे केंद्रीय मंत्री नाईक म्हणाले.

22 विधेयके मंजूर

या अधिवेशनात सरकारने २२ महत्त्वाची विधेयके मंजूर केली. ब्रिटिशांनी आपल्या मर्जीनुसार लोकांना त्रास देणारे कायदे केले होते. त्यांतील जाचक असे सव्वा दोनशी कायदे बदलून नवीन केले असून कारण शिक्षेपेक्षा प्रशासकीय कामकाज व व्यवस्था सुरळीत व्हावी, हा त्या मागचा उद्देश आहे, असा दावा मंत्री नाईक यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: विदेशी पर्यटकांची गोव्‍याऐवजी श्रीलंकेला पसंती! वाढीव व्‍हिसा शुल्‍काचा परिणाम; रशियन पर्यटकांचे मात्र प्राधान्‍य

Bhandari Community In Goa: निवडून आल्यानंतर 'जैसे थे' आदेश! भंडारी समाजाच्या निवडणूक प्रक्रियेत नाट्यमय वळण

Goa Crime: कॉन्‍स्‍टेबल आत्‍महत्‍या प्रकरण! ‘त्या’ दोन महिला पोलिसांना अटक; प्रेमप्रकरणावरुन सतावणूकीचे सापडले 'कॉल्स'

Rashi Bhavishya 05 November 2024: व्यवसायात प्रगती कराल, मेहनतीला यश मिळले; जाणून घ्या काय सांगतयं 'या' राशीचं भविष्य

Cash For Job प्रकरणातील तिघीही अटकेत! आत्‍महत्‍या प्रकरणी पूजावर गुन्‍हा; आणखी एक नवी तक्रार दाखल

SCROLL FOR NEXT