Sadguru Brahmanand Acharya Swamiji
Sadguru Brahmanand Acharya Swamiji  Dainik Gomantak
गोवा

South Goa: धेंपेंच्या पराभवासाठी ब्रह्मेशानंद स्वामी जबाबदार? तानावडेंचा काँग्रेसकडून निषेध, माफी मागण्याची मागणी

Pramod Yadav

South Goa

भाजपचे दक्षिण गोवा उमेदवार पल्लवी धेंपे यांच्या पराभवासाठी परमपूज्य सद्गुरु ब्रह्मेशानंद स्वामीजींना जबाबदार धरणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्या वक्तव्याचा काँग्रेसने निषेध केला आहे. भाजपच्या अहंकाराला दक्षिण गोव्याने धडा शिकवला, असा दावा काँग्रेस माध्यम विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी केला.

स्वामी ब्रह्मेशानंद यांचा गोमंतकीयांना मतदान करण्याचे आवाहन करणारा एक व्हिडिओ जारी करून अमरनाथ पणजीकर यांनी सदर व्हिडिओमूळेच परम पूज्य स्वामीजींना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केल्याचा आरोप भाजपवर केला आणि सदानंद तानावडे यांनी स्वामी ब्रह्मेशानंद यांची माफी मागावी अशीा मागणी केली.

राज्यसभा खासदार सदानंद तानावडे यांनी स्वामीजींनी आपल्या भक्तांना मतदानाचे पवित्र कार्य करण्याच्या केलेल्या आवाहनाला "धर्मगुरूंचा राजकीय हस्तक्षेप" असे संबोधणे धक्कादायक आहे, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.

दक्षिण गोव्यात भाजपने आयात केलेल्या धनाड्य उमेदवाराचा मानहानीकारक पराभव झाल्याने भाजप पूर्णपणे हताश झाल्याचे पणजीकर म्हणाले.

हिंदू बहुजन समाज आणि एसटी समुदायाची मोठी लोकसंख्या असलेल्या फोंडा, शिरोडा, सांगे, मुरगाव, कुडचडे, मडगाव, नावेली, नुवें मतदारसंघातील लोकांनी अपेक्षेप्रमाणे भाजपला मतदान केले नाही. विशेष म्हणजे या सर्व मतदारसंघांचे प्रतिनिधित्व भाजपचे आमदार करतात, असे त्यांनी नमूद केले.

गद्दारांना पक्षात प्रवेश देऊन देव आणि जनादेशाचा विश्वासघात करणाऱ्या सर्वांना दक्षिण गोव्यातील जनतेने धडा शिकवला. भाजप अध्यक्षांना त्यांच्या पराभवासाठी कोणत्याही धर्मगुरू किंवा अध्यात्मिक नेत्याला दोष देण्याचा अधिकार नाही. भाजपचा गरीब विरोधी आणि श्रीमंत समर्थक अजेंड्यामूळेच दक्षिण गोव्यात भाजपला पराभव पत्करावा लागला आहे, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.

परमपूज्य ब्रह्मेशानंद स्वामीजींनी दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने कळंगुटचे थायलंड केले असे वक्तव्य करुन भाजपच्या कारभाराचा पर्दाफाश केला होता.

स्वामीजींच्या सदर विधानाला कळंगुटच्या मतदारांनी दुजोरा देत उत्तर गोव्यातील काँग्रेसच्या उमेदवाराला कळंगुटमध्ये मतांची आघाडी दिली. यामुळे संतापलेल्या सदानंद तानावडेनी स्वामीजींचे थेट नाव न घेता त्यांच्यावर आरोप केला असावा, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Police: कोलवा PSI ची महिलेला मारहाण, दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांची पहिली प्रतिक्रिया

Pernem News: रस्त्यावर गटारातले सांडपाणी, खड्डे आणि वाढलेली झाडेझुडपे; हद्दीच्या वादात पेडणेवासीयांच्या डोक्याला ताप

Margao News: उच्‍च न्‍यायालयाने आदेश देऊनही थर्माकाेलच्‍या राशी तशाच

11000000000 कोटींची डील! बाबा रामदेव यांच्या पतंजलीबाबत मोठी अपडेट; कोण विकत घेतय दंत आणि केश कांती?

Tiracol Village: गोवा मुक्तीनंतर तेरेखोलमध्ये हे पहिल्यांदाच घडतंय; आता महाराष्ट्रावर अवलंबून रहावे लागणार नाही

SCROLL FOR NEXT