Goa Monsoon 2024: गोव्यात मॉन्सून वेळेत दाखल, लोकसभा निकालादिवशी राजधानातील रस्ते जयमल

Goa Monsoon 2024: गेल्या चोवीस तासांत पणजीत सर्वाधिक 49.2 MM पावसाची नोंद झाली.
Goa Monsoon 2024
Goa Monsoon 2024Sandip Desai

Goa Monsoon 2024

मॉन्सून कर्नाटक राज्य व्यापत गोव्यातील दक्षिण भागात मंगळवारी दाखल झाला. येत्या काही दिवसांत तो संपूर्ण गोवा व्यापणार आहे, असे गोवा वेधशाळेने आपल्या अहवालात म्हटले आहे. मॉन्सून अरबी समुद्र, गोवा आणि कर्नाटक, तेलंगणाच्या आणखी काही भागांत पुढे सरकत असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

केरळमध्ये 31 मे रोजी मॉन्सून दाखल झाला होता. सर्वसामान्यपणे केरळात मॉन्सून दाखल झाल्यानंतर 04 ते 05 दिवसांत गोव्यात दाखल होतो. त्यानुसार यंदा राज्यात वेळेत मॉन्सून दाखल झाला आहे.

लोकसभा निकालाच्या दिवशी (०४ जून) राजधानी पणजीसह राज्यात इतर ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पणजी एक तास मुसळधार पाऊस झाला, या वेळेत शहरातील सर्व रस्ते जलमय झाले. पणजी आणि पर्वरीला जोडणारा मांडवी पूल जलमल झाला होता. पूलावर साचलेल्या पाण्यातूनच वाहनधारकांना मार्ग काढवा लागला.

Goa Monsoon 2024
Goa Loksabha Election Result: मांद्रे, पेडणेत खलपांना अनपेक्षित धक्का; राजकीय जाणकारांचा अंदाजही ठरला चुकीचा!

गोवा वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार गेल्या चोवीस तासांत पणजीत सर्वाधिक 49.2 MM पावसाची नोंद झाली तर, मुरगावमध्ये 13.4 MM आणि म्हापसा येथे 12.2 MM पावसाची नोंद झालीय.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com