Damu Naik In Delhi Dainik Gomantak
गोवा

भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक दिल्लीत, पक्षाध्‍यक्ष नितीन नबीन यांच्यासह वरिष्‍ठांशी करणार चर्चा; बैठकांबाबत उत्सुकता

Damu Naik In Delhi: फोंडा पोटनिवडणूक रद्द करण्‍याचा निवाडा बुधवारी उच्च न्‍यायालयाने दिल्‍यानंतर राज्‍यात खळबळ माजलेली असतानाच, भाजप प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक गुरुवारी दिल्लीत दाखल झाले आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: फोंडा पोटनिवडणूक रद्द करण्‍याचा निवाडा बुधवारी उच्च न्‍यायालयाने दिल्‍यानंतर राज्‍यात खळबळ माजलेली असतानाच, भाजप प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक गुरुवारी दिल्लीत दाखल झाले आहेत. शुक्रवारी ते भाजपाध्‍यक्ष नितीन नबीन यांच्‍यासह इतर वरिष्‍ठ नेत्‍यांशी चर्चा करणार असल्‍याची माहिती सूत्रांनी ‘गोमन्‍तक’शी बोलताना दिली. या बैठकांकडे राज्‍याचे लक्ष लागून राहणार आहे.

फोंडा पोटनिवडणुकीबाबत उच्च न्‍यायालयात सुनावण्‍या सुरू असतानाही भाजप, काँग्रेस, आप या पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी केली. काँग्रेस, ‘आप’च्‍या तुलनेत भाजपने आपले उमेदवार रितेश नाईक यांच्‍या प्रचारासाठी कंबर कसली होती.

मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांनी ७० पेक्षा अधिक बैठका घेत फोंडा पिंजून काढलेला होता. शिवाय मंत्री आणि आमदारांनाही प्रचारात उतरवले होते. त्‍यानंतर महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रचारात उतरवून भाजपने प्रचारात अधिक रंगत भरलेली होती. अशा स्‍थितीत गुरुवारी निवडणुकीसाठी मतदान होणार असतानाच उच्च न्‍यायालयाने बुधवारीच अंतिम निवाडा देत, पोटनिवडणूक रद्द केल्‍याचे जाहीर केले. त्‍यामुळे राज्‍यभरात खळबळ माजलेली होती.

भाजपने निवडणूक आयोगाला हाताशी धरून फोंडा निवडणूक रद्द करून घेतल्‍याचा दावा काँग्रेस, आपकडून केला जात आहे. तर, उच्च न्‍यायालयाच्‍या निर्णयामुळे आम्‍हालाही धक्‍का बसलेला आहे. भाजपला निवडणूक रद्द करून घ्‍यायची होती, तर मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ४० पेक्षा अधिक बैठका घेतल्‍या असत्‍या का? असा प्रश्‍‍न भाजप नेत्‍यांकडून विचारण्‍यात येत आहे. दरम्‍यान, या पार्श्वभूमीवरच दामू नाईक गुरुवारी तत्‍काळ दिल्लीत दाखल झाल्‍याने फोंडा पोटनिवडणूक रद्दसंदर्भात त्‍यांची वरिष्‍ठांशी काय चर्चा होणार? भाजप पुढे काय निर्णय घेणार? याकडे राज्‍याचे लक्ष लागून असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Childhood Depression: स्मार्टफोन आणि नैराश्य

Goa Monsoon: गोव्यात मान्सूनचे आगमन; हवामान विभागाडून चार दिवसांचा 'यलो अलर्ट'!

मालपे येथील संरक्षक भिंत पुन्हा धोक्यात; पावसाळ्यापूर्वी तातडीने दुरुस्ती करण्याची स्थानिकांची मागणी

Goa Power Cuts: हसापूर, हणखणेतील वीज समस्या सोडवा; काँग्रेस कार्यकर्त्यांची वीज कार्यालयावर धडक, साहाय्यक अभियंत्यांशी चर्चा

Hasapur Bridge: हसापूर पूल महिन्याभरात वाहतुकीस खुला; काँक्रीटचे काम पूर्ण

SCROLL FOR NEXT