Goa CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

अपक्ष उमेदवारांच्या संपर्कात भाजप; CM प्रमोद सावंत

पंतप्रधान नरेंद्र मोदी पाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांचीही घेणार भेट

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते प्रमोद सावंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. दरम्यान मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदींशी माझी ही पहिलीच भेट आहे, नुकत्याच झालेल्या निवडणुका आणि एक्झिट पोलबद्दल पंतप्रधानांना माहिती देईन. (Goa BJP party is in touch with certain IND candidates)

तसेच गोव्यात सरकार स्थापनेबाबतही चर्चा करणार; मला विश्वास आहे की गोव्यात पुढील सरकार भाजपच स्थापन करेल आणि माझा पक्ष काही IND उमेदवारांच्या संपर्कात आहे; दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे आशीर्वाद आमच्यावर आहेत; मी आज संध्याकाळी देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार आहे.

मंगळवारी सावंत आणि पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांची भेट होणार आहे. याचबरोबर मुख्यमंत्री सावंत आणि गोवा भाजप प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. गुरुवारी 10 तारखेला गोव्याच्या जनतेने कुणाला कौल दिला आहे हे स्पष्ट होणार आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीत सर्वच उमेदवार आपल्या विजयाचा दावा करत आहेत. यातच आता साखळीतून निवडणूक लढवलेल्या मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी आपल्या विजयाचे भाकीत केले आहे. मुख्यमंत्री सावंत म्हणाले, गोवा विधानसभा ​निवडणुकीत माझा पराभव व्हावा म्हणून सर्व विरोधी पक्षांनी प्रयत्न केले. मात्र, याचा काहीही फायदा होणार नाही. मी साखळीतून पाच हजार मताधिक्याने निवडून येणार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

Cab Driver Mental Test: कॅबचालकांची ‘मेंटल टेस्‍ट’ हवीच, केंद्राच्‍या प्रस्‍तावाचे गोव्यात स्‍वागत; अपघात, दुष्‍कृत्‍ये टळणार

Petrol Diesel Prices In Goa: महाराष्ट्र, कर्नाटकपेक्षा गोव्यात पेट्रोल - डिझेल स्वस्त; जाणून घ्या ताजे भाव

Junta House: ‘पणजीतील जुन्‍ता हाऊस 30 दिवसांत रिकामे करा’, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; इमारतीचे होणार नूतनीकरण

Goa News Live: सराईत गुंड 'टारझन' विरोधात हत्यार कायद्याखाली गुन्हा; अड्डयावर सापडली तलवार

SCROLL FOR NEXT