Goa BJP MLA trawler seized Dainik Gomantak
गोवा

Illegal Fishing: भाजप आमदाराच्या मालकीचा ट्रॉलर जप्त? महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बेकायदेशीर मासेमारी! अधिकाऱ्यांकडून मोठी कारवाई

Goa BJP MLA trawler seized: एलईडी मासेमारी उपकरणांचा वापर करून मासेमारी करत असल्याप्रकरणी गोव्यातील दोन ट्रॉलर्स महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांनी जप्त केल्या आहेत.

Sameer Amunekar

महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बंदी असलेल्या एलईडी मासेमारी उपकरणांचा वापर करून मासेमारी करत असल्याप्रकरणी गोव्यातील दोन ट्रॉलर्स महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांनी जप्त केल्या आहेत. गुरुवारी करण्यात आलेल्या या कारवाईत संबंधित ट्रॉलर्स महाराष्ट्राच्या सागरी अधिकारक्षेत्राचे उल्लंघन करत असल्याचे स्पष्ट झाले असून स्थानिक कायद्यांनुसार ही पद्धत बेकायदेशीर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

एलईडी लाईट्सच्या मदतीने मासेमारी केल्यास मोठ्या प्रमाणावर मासे आकर्षित होतात, ज्यामुळे सागरी परिसंस्थेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने या प्रकारच्या उपकरणांवर बंदी घातली असून, त्या नियमांचे उल्लंघन झाल्याने ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या ट्रॉलर्सपैकी एक गोव्यातील भाजप आमदाराच्या मालकीची असल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेमुळे आंतरराज्य सागरी हद्दीतील नियंत्रण आणि बेकायदेशीर मासेमारीविरोधातील कारवाईबाबत चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान, सागरी जीवसृष्टीला धोका निर्माण करणाऱ्या या प्रतिबंधित एलईडी उपकरणांच्या वापरावर कडक नजर ठेवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. भविष्यात अशा प्रकारचे उल्लंघन रोखण्यासाठी संयुक्त पथकांच्या माध्यमातून नियमित गस्त वाढवण्याचा निर्णयही घेतला जाणार आहे.

बेकायदेशीर मासेमारी रोखण्यासाठी सागरी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचा पुनरुच्चार अधिकाऱ्यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy: गोव्याविरुद्धच्या रणजी सामन्यापूर्वी बिहार संघात मोठी उलथापालथ! सकिबुल गनीकडून कर्णधारपद काढून घेतलं, मंगल महरौर करणार नेतृत्व

India U19 Cricket: गोव्याच्या चिगुरुपती व्यंकटची टीम इंडियात एंट्री; आशिया कपसाठी मिळाली संधी

Panaji Market: वास्कोच्या आगीनंतर पणजी महापालिका सतर्क; खाद्यपदार्थ बनविणाऱ्या दुकानाला ठोकले टाळे

अविवाहित असल्याचं भासवून लग्नाचं आमिष दाखवलं... लैंगिक शोषण प्रकरणात संशयिताला दिलासा नाही, अटकपूर्व जामीन कोर्टानं फेटाळला

River Pollution: साळ नदीच्या प्रदूषणाला बेकायदेशीर घरे कारणीभूत? सरपंच डिक्सन वाझ यांचा आरोप

SCROLL FOR NEXT