Goa BJP  Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: भाजपमधील सुंदोपसुंदीची दिल्लीत दखल

BJP Government: संघासोबत बैठकीचे निर्देश; सरकारची डागाळलेली प्रतिमा पुन्‍हा मिळविण्‍यासाठी धडपड

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोवा मतदारसंघात आलेले अपयश आणि त्यानंतर मंत्री, आमदारांच्या वक्तव्यांमुळे डागाळत गेलेल्या प्रतिमेची दखल भाजपच्या नेतृत्वाने घेतली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मदत घ्यावी असे दिल्लीतून सुचवण्यात आले आहे. दर दोन महिन्यांतून एकदा भाजप पदाधिकारी व संघ पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्याची सूचना करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती. त्यानंतर अशी बैठकच झालेली नाही. दिल्लीतून आता संघाचे मार्गदर्शन घेण्याची सूचना करण्यात आल्याने येत्या पंधरा दिवसांत अशी बैठक होण्याची शक्यता आहे.

सध्या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांत भाजपचे पक्षश्रेष्ठी व्यस्त असल्याने गोव्याविषयी चर्चा करण्यास ते तूर्त तयार नाहीत. त्यामुळे तूर्त संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घ्या आणि पावले टाका असे सुचवण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकीत उमटू शकतात पडसाद

विधानसभेत सत्ताधारी आमदारांनी सरकारवर केलेली टीका, मंत्र्यांमध्‍ये उफाळून आलेले वाद, मंत्र्यांची वादग्रस्‍ते वक्तव्‍ये, विरोधकांनी धारण केलेले आक्रमक रूप या साऱ्यांबाबत दिल्लीत सध्या चिंतेचे वातावरण आहे. राष्ट्रीय माध्यमांतूनही गोव्याची प्रतिमा समोर येत आहे, ती तशीच येत राहिल्यास त्याचे पडसाद राज्यात यापुढे होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमटू शकतील याचा अंदाज भाजपला आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco ATM Scam: एटीएममध्ये पैसे भरणारेच निघाले चोर! खासगी कंपनीच्या 5 कर्मचाऱ्यांनी लंपास केले 14 लाख; वास्कोतील धक्कादायक प्रकाराने खळबळ

Goa Tiger Symbolism: वाघाच्या पुढच्या 2 पायांमध्ये रानडुक्कर, तर मध्ये छोटेखानी सिंह; वागऱ्यागाळ येथील वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती

Vaibhav Suryavanshi Century: 15 षटकार 11 चौकार...! 32 चेंडूत शतक ठोकत रचला इतिहास, कतारमध्ये 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीचं वादळ VIDEO

Viral Video: भर रस्त्यात काकाची 'दारु पार्टी'! कुणाचीही हटवण्याची हिंमत नाही, व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले, "काका ऑन रॉक"

VIDEO: बुमराहच्या तोंडून निघाली शिवी, बावुमाच्या उंचीवर केलेलं वक्तव्य व्हायरल; म्हणाला, 'बौना भी तो है यह...'

SCROLL FOR NEXT