C. T. Ravi
C. T. Ravi Dainik Gomantak 
गोवा

Goa Congress : काँग्रेसचे आमदार भाजपच्या संपर्कात

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Congress : गोव्यासह महाराष्ट्र, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशमधील अनेक काँग्रेस आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे सरचिटणीस आणि गोवा प्रभारी सी. टी. रवी यांनी दिवाडी येथे केला आहे. पक्षाच्या उच्चस्तरीय नेत्यांचे तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण आज गुरुवारपासून सुरू झाले आहे. मुख्यमंत्र्यांसह मंत्री, आमदार आणि सुकाणू समितीचे नेते या शिबिराला उपस्थित आहेत. उद्‍घाटन सत्रानंतर रवी यांनी माध्यमांशी संवाद साधला.

ते म्हणाले, पक्षाच्या राष्ट्रवादाच्या कार्यामुळे विविध राज्यातील अनेक आमदार पक्षाकडे आकृष्ट होत आहेत. प्रामुख्याने गोव्यासह महाराष्ट्र, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशमधील अनेक काँग्रेसचे आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. याबाबतचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेईल. रवी यांच्या या वक्तव्यामुळे काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे काही आमदार भाजपमध्ये सहभागी होणार अशी चर्चा सुरू झाली होती, त्या मिशन लोटसला पुष्टी मिळते. याशिवाय आमदारांच्या पक्षांतराला पुन्हा बळ मिळू शकते. तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराची सुरवात सी.टी. रवी यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, आरोग्य मंत्री विश्वजीत राणे, पंचायत मंत्री माविन गुदिन्हो उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी या शिबिरामागील भूमिका स्पष्ट करत प्रस्तावना केली. गोरख मांद्रेकर हे या शिबिराचे समन्वयक म्हणून काम करत आहेत.

रवी म्हणाले, देशाला मजबूत करण्याबरोबर विश्वगुरू बनवण्यासाठी 2024 च्या निवडणुकीत भाजप सत्तेत येणे गरजेचे आहे. पक्षाची नीती, नेता आणि नियत चांगली असल्यामुळे देशभर भाजपाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. काँग्रेसने आतापर्यंत वंशवादाला आणि भ्रष्टाचाराला पाठिंबा दिला. आता त्याला फाटा मिळाला आहे. सध्या आमचे लक्ष्य गोव्यातील लोकसभेच्या दोन्हीही जागा जिंकण्याबरोबर देशभरात एनडीएला 400 पेक्षा जास्त जागा जिंकणे हे आहे. त्यात आम्ही यशस्वी होवू.

नेटक्या नियोजनात 13 अभ्यास सत्रे

या तीन दिवसांच्या निवासी शिबिरात 13 अभ्यास सत्रे होत असून संपादक शिवशक्ती, आमदार हेमंत गोस्वामी, आमदार अभय पाटील, प्रा.दत्तेश परळेकर , माजी खासदार नरेंद्र सावईकर, सरचिटणीस सी.टी. रवी, संयुक्त सरचिटणीस (संघटन) शिवप्रकाश, आमदार श्रीकांत भारतीय, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राष्ट्रीय सरचिटणीस बी.एल. संतोष हे विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.

90 टक्के प्रतिसाद

शिबिराला मंत्री, आमदार, राज्य समिती सदस्य, विविध मोर्चाचे अध्यक्ष, सरचिटणीस, दोन्ही जिल्हाध्यक्ष यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, आजच्या सत्राला मंत्री बाबुश मोन्सेरात, रवी नाईक, आमदार जोशुवा डिसोजा,जेनिफर मोन्सेरात यांच्यासह अनेकांची गैरहजेरी दिसली. कदाचित ते उद्या किंवा परवा हजर राहू शकतात.

दरम्यान डबल इंजिनच्या सहाय्याने राज्यात अनेक योजना कार्यान्वित झाल्यात. पूर्वी सासष्टी मधील लोक भाजपाला मतदान करत नव्हते हे मिथ्य आता मागे पडले. नावेलीची जागा भाजपने जिंकली आहे. त्यामुळे लोकसभेची दक्षिण गोव्याची जागाही नक्कीच जिंकू, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Session Court: वेश्याव्यवसायासाठी महिलांची खरेदी आणि पुरवठा केल्याप्रकरणी एकजण दोषी

Vasco News : चिखलीत बिल्डरने अवैधपणे बनवली पार्किंगसाठी जागा

Pernem Rain : वादळी वाऱ्यामुळे पेडणे तालुक्यात पडझड सुरूच

Tihar Jail: तिहार जेल उडवून देण्याची धमकी; पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरु

Supreme Court: ‘PM मोदींवर 6 वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घाला’, सर्वोच्च न्यायालयात याचिका; वाचा नेमंक प्रकरण?

SCROLL FOR NEXT