आमचे भाजप सरकार संवेदनशील आहे. काँग्रेसचे राहुल गांधी विदेशात जाऊन लोकशाहीचे धिंडवडे काढतात. भाजपने पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशात विकास केला आहे. गोव्यात पेडणे ते काणकोणपर्यंत पूर्णत्वास आलेले प्रकल्प विविध भागात जाऊन जनसंपर्क साधून जनतेपुढे ठेवणे व त्याचे वर्णन करणे हे विकास तीर्थ यात्रेच उद्दिष्ट आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारतीय जनता पक्षाने आज मेगा जनसंपर्क अभियानांतर्गत नव्याने उद्घाटन झालेल्या केबल स्टे झुआरी पुलावरून दक्षिण गोव्यातील ‘विकास तीर्थ यात्रे’ला सुरवात केली. त्यावेळी ते बोलत होते.
विकास तीर्थ यात्रेचे उद्दिष्ट पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सुशासन, चांगली कामे पाहणे, तपासणे आणि इतरांना त्यांचे वर्णन करणे हे आहे.
यावेळी मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, मडगावचे आमदार दिगंबर कामत, दक्षिण गोव्याचे माजी खासदार नरेंद्र सावईकर, दामू नाईक, तुळशीदास नाईक, श्री. भगत, चंद्रकांत गवस, जयंत जाधव, नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा, सांतआंद्रेचे माजी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा. आदींच्या उपस्थितीत विकास तीर्थ यात्रेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
‘दोन्ही जागा आम्हीच जिंकणार’
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या कारकीर्दीची पुस्तिका भेट देवून लोकांना मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सुशासन, लोकांच्या डोळ्यासमोर ठेवायचा हा प्रयत्न आहे. भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार परत एकदा पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली येईल यात शंकाच नाही. २०१४ च्या निवडणुकीत गोव्यात दोन्ही जागा भाजप जिंकणार हे नक्की, असा विश्वास यावेळी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी व्यक्त केला.
"मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशात व गोव्यात झालेला विकास कार्यकर्त्यांनी स्वत:हून पाहून नंतर लोकांपर्यत पोचवण्याचा हा एक कार्यक्रम आहे. या विकास तीर्थ यात्रेतून फिर एक बार मोदी सरकार हा नारा असणार आहे."
दिगंबर कामत, आमदार
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.