Goa State BJP Women's Front Dainik Gomantak
गोवा

Goa: राज्यात पुन्हा एकदा भाजप सरकार येणार- डॉ. शीतल नाईक

सरकारची कामगिरी आणि भाजपचे संघटनात्मक कार्य यामुळे राज्यात (Goa) पुन्हाही भाजपचेच (BJP) सरकार सत्तेवर येईल.

दैनिक गोमन्तक

डिचोली: सरकारची कामगिरी आणि भाजपचे संघटनात्मक कार्य यामुळे राज्यात (Goa) पुन्हाही भाजपचेच (BJP) सरकार सत्तेवर येईल. असा विश्वास गोवा राज्य भाजप महिला मोर्चाची अध्यक्ष डॉ. शीतल नाईक (Dr. Sheetal Naik) यांनी डिचोलीत बोलताना व्यक्त केला. डिचोली मतदारसंघ (Bicholim Constituency) भाजपची महिला मोर्चा समिती जाहीर केल्यानंतर उपस्थित महिला कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

आगामी निवडणुकीत डिचोली मतदारसंघातून पुन्हा भाजप उमेदवाराला निवडून आणण्यासाठी महिला कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. असे आवाहनही डॉ. नाईक यांनी केले. यावेळी डिचोलीच्या उपनगराध्यक्ष तनुजा गावकर, राज्य महिला मोर्चाची सरचिटणीस शिल्पा नाईक, सदस्य तथा डिचोलीच्या नगरसेविका दीपा शेणवी शिरगावकर, डिचोली भाजप मंडळाचे अध्यक्ष विश्वास गावकर आदी उपस्थित होते. शिल्पा नाईक यांनीही भाजप संघटन कार्यावर भर देत असल्याचे सांगितले. स्वागत विश्वास गावकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. कौस्तुभ पाटणेकर यांनी केले.

डिचोली महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी शर्मिला पळ

यावेळी शर्मिला मिलिंद पळ यांच्या अध्यक्षतेखाली डिचोली भाजप महिला मोर्चा समिती जाहीर करण्यात आली. समिती पुढीलप्रमाणे- अध्यक्ष-शर्मिला पळ, उपाध्यक्ष- विमल मिश्रा, सोनाली बिर्जे आणि कुंदा च्यारी. सरचिटणीस-सपना शिरोडकर, सचिव-राजेश्वरी मळीक, नीता सिन्हा आणि आनंदी परब. सभासद-वंदना गावकर, वर्षा साळकर, अनुजा मणेरीकर, श्रुती घाटवळ, संक्रीता देसाई, दीपा पळ आणि सिया गाड.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोमंतकीय संस्कृतीने सजला IFFI 2024! आकाशकंदील स्पर्धा, शिगमा-कार्निव्हल परेडला भरघोस प्रतिसाद

महिलेच्या खासगी जागी बोट लावणे लैंगिक अत्याचार होत नाही; गोवास्थित मुंबई हायकोर्टाचा निर्णय, संशयिताला जामीन

Nagarjuna At IFFI: 'त्यांचे उद्दिष्ट होते की तेलुगु चित्रपट सृष्टीला दखल घेण्याजोगी..', नागार्जुनने जागवली वडिलांची हृदयस्पर्शी आठवण

Calangute Baga: उत्तर गोव्यातील प्रसिद्ध भाग दाखवला रेड लाईट एरिया; Youtuber ने हात जोडून मागितली माफी

Goa Today's News Live: कळंगुटमध्ये रस्त्यावर नग्न होऊन राडा करणाऱ्या UP च्या पर्यटकाला अटक

SCROLL FOR NEXT