Goa News | Pramod Sawant dainik gomantak
गोवा

Goa News: नवागतांना श्रीमंत महामंडळे मिळण्‍याची शक्‍यता कमीच- प्रमोद सावंत

Goa News: मंत्रिपदाचा निर्णय मात्र पक्षश्रेष्‍ठी घेतील, असे सांगून मुख्‍यमंत्र्यांनी आपले हात झटकले होते.

दैनिक गोमन्तक

Goa News: काँग्रेसमधून फुटून भाजपात आलेल्‍या आठ आमदारांना महामंडळांचे वाटप करताना ती अन्‍य कोणाकडून काढून आपण देणार नाही, अशी स्‍पष्‍ट भूमिका मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतली आहे. त्‍यामुळे आधीच अस्‍वस्‍थ बनलेल्‍या या नवागतांची अवस्‍था वैफल्‍यग्रस्‍त बनली आहे. गुरुवारी पणजीतील एका हॉटेलात या आठ जणांची बैठक होऊन भाजपात आपली तीव्र अवहेलना होत असल्‍याची भावना त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

या आठ जणांच्‍या गटातील दिगंबर कामत व मायकल लोबो यांची एक बैठक गेल्‍या आठवड्यात मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत व प्रदेशाध्‍यक्ष सदानंद तानावडे यांच्‍यासोबत मुख्‍यमंत्र्यांच्‍या बंगल्‍यावर झाली होती. त्‍यावेळीच मुख्‍यमंत्र्यांनी ‘आपण कोणाची महामंडळे काढून नवागतांना ती देणार नाही, जी महामंडळे शिल्‍लक आहेत, त्‍यांचेच वाटप करता येईल’, अशी भूमिका स्‍पष्‍ट केली होती.

मंत्रिपदाचा निर्णय मात्र पक्षश्रेष्‍ठी घेतील, असे सांगून मुख्‍यमंत्र्यांनी आपले हात झटकले होते. सूत्रांच्‍या मते, नवागतांमध्‍ये केवळ आलेक्‍स सिक्‍वेरा यांना मंत्रिपद देण्‍याचे वचन पक्षश्रेष्‍ठींनी दिले होते. त्‍यासाठी गोविंद गावडे यांना डच्‍चू देण्‍याचे सध्‍या घाटत आहे. परंतु, निर्णय पक्षश्रेष्‍ठींनी घ्‍यावयाचा असून, सध्‍या गुजरात व हिमाचलच्‍या निवडणुकीत नेते व्‍यग्र आहेत.

कामत यांना केंद्रात नेण्‍याचा पक्षश्रेष्‍ठींचा मनसुबा त्‍यांनी त्‍याचवेळी जाहीर केला असला तरी सध्‍या कामत यांना मंत्रिपद हवे आहे आणि त्‍यांनी तसे मुख्‍यमंत्र्यांकडे बोलूनही दाखवले आहे, असे सूत्रांनी सांगितले.

  • बैठकीत बहुसंख्‍य नवागतांनी भाजपात प्रवेश करून आपली तीव्र निराशा झाल्‍याचे मत व्‍यक्‍त केले. सत्ताधारी पक्षाचे सदस्‍य व मंत्री भाव देत नाहीत व मुख्‍यमंत्र्यांकडूनही दुजाभावाची वागणूक मिळत असल्‍याचा आरोप काही सदस्‍यांनी केला.

  • सूत्रांच्‍या मते, नवागतांपैकी सहा सदस्‍यांनी कसल्‍याही देणग्‍या न स्‍वीकारता प्रवेश केला. त्‍यानंतरच्या दोन सदस्‍यांनी भरमसाट देणग्‍या प्राप्‍त केल्‍याचा आरोप होत आहे. हे दोन सदस्‍य वगळता इतरांना मंत्रिपद किंवा श्रीमंत महामंडळांची आस आहे.

  • गुरुवारच्‍या बैठकीनंतर या आठजणांनी मुख्‍यमंत्र्यांची भेट मागितली. परंतु, एकत्रित ऐवजी प्रत्‍येकाने स्‍वतंत्रपणे आपली भेट घ्‍यावी, असे मुख्‍यमंत्र्यांनी सुचविल्यानंतर अनेकजण त्‍यांना भेटले. यावेळी मात्र संपूर्ण गटाची एकत्रित मागणी पुढे रेटण्‍याऐवजी प्रत्‍येकाने वैयक्‍तिक मागण्‍यांचीच यादी मुख्‍यमंत्र्यांना सादर केली. त्‍यामुळे गट म्‍हणूनही त्‍यांच्‍यात एकी नसल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asrani Death: हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं! प्रसिद्ध डायलॉग मागील आवाज कायमचा शांत झाला; अभिनेते असरानींचे निधन

स्वप्नपूर्ती! फक्त 60 रूपयांत स्टेडियममधून पाहा टीम इंडियाचा कसोटी सामना, ऑफर कधी आणि कशी मिळेल? जाणून घ्या

Ponda Accident: कारने धडक दिल्याने एका 8 वर्षांच्या मुलीचा मृत्यू

Viral Post: "विश्वचषक जिंकायचा असेल तर अजित आगरकर, गौतम गंभीरला हटवा", व्हायरल पोस्टवर नवज्योत सिंग सिद्धू संतापले

Horoscope: लक्ष्मीपूजन होणार फलदायी! दिवाळीच्या काळात 'या' 5 राशींना मिळणार यश आणि संपत्ती, वाचा सविस्तर दैनिक राशी भविष्य

SCROLL FOR NEXT