Goa Government | Girish Chodankar
Goa Government | Girish Chodankar Dainik Gomantak
गोवा

Goa Government: राज्यपाल पिल्लई हुकूमशाहीपुढे झुकले- गिरीश चोडणकर

दैनिक गोमन्तक

Goa Government: राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई हे राज्यातील भाजप सरकारच्या हुकूमापुढे झुकले आहेत. नगरपालिकांचे नगराध्यक्ष निवडण्यासाठी ‘गुप्त मतदान’ पद्धतीचा भंग करण्याच्या अध्यादेशाला त्यामुळेच त्यांनी संमती दिल्याची टीका गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

पत्रकात त्यांनी पुढे म्हटले आहे, की राज्यपाल पिल्लई यांनी आपली तत्त्वे आणि नैतिकतेशी तडजोड केली आहे. त्याशिवाय अशी संमती देऊन कर्तव्यात कसूर केली आहे. ज्यामुळे लोकशाहीचा आणखी घात झाला आहे.

काँग्रेसने या अध्यादेशाविरोधात आवाज उठवला असूनही आणि निवेदन सादर करूनही त्याला संमती दिली गेली. येथील जनतेला राज्यपालांकडून अशी अपेक्षा नव्हती. एक नामांकित वकील, विचारवंत आणि लेखक म्हणून ओळखले जाणारे राज्यपाल पिल्लई लोकशाही मूल्यांवरील श्रध्देसाठी परिचित आहेत. त्यांनी सरळ माणूस म्हणून स्वतःची प्रतिष्ठा आणि प्रतिमा कलंकित केली आहे.

देशात सर्व राज्यांतील विरोधी पक्ष संपवण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे, हे सर्वश्रुत आहे. राज्यपाल पिल्लई यांनी भाजपच्या दबावाखाली ज्या गोष्टींवर विश्वास ठेवला आहे, त्याविरुद्ध काम केल्याबद्दल त्यांचा विवेक त्यांना नक्कीच अस्वस्थ करीत राहील.

तसेच, त्यांच्या कृत्याने दुखावलेल्या त्यांच्या अनेक समर्थकांपैकी मीही एक आहे. या लाजिरवाण्या दुरुस्त्या करून भाजप सरकारने आपले राजकारण गटारापर्यंत खाली नेले आहे. भाजप सरकारने केलेल्या कायद्यातील दुरुस्त्या त्वरित मागे घ्याव्यात, अशी आमची मागणी असल्याचे चोडणकर यांनी नमूद केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa Today's Live Update: गोव्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा

Mapusa News : झोपडपट्ट्या कायदेशीर करणार : रमाकांत खलप

Panaji News : भाजपने पक्षांतराबद्दल भूमिका स्पष्ट करावी; इंडिया आघाडीच्या प्रवक्त्यांची मागणी

Mark Zuckerberg यांचा पगार फक्त 83 रुपये, पण सुरक्षेवर होतो कोट्यवधींचा खर्च; उत्पन्न आणि खर्चाचा हिशेब पाहून व्हाल थक्क!

Valpoi News : प्रलंबित खटल्यांमध्ये ‘मध्यस्थी’ उत्तम पर्याय : ॲड. सावईकर

SCROLL FOR NEXT