Goa Politics: ज्यांच्याकडे संख्या जास्त त्यांची सत्ता हे लोकशाहीचे मुख्य तत्त्व आहे. मडगाव नगराध्यक्ष निवडीसाठी सरकारने काढलेला अध्यादेश कायद्याला धरूनच आहे, असे आमदार दिगंबर कामत यांनी स्पष्ट केले.
पणजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खासदार नरेंद्र सावईकर, माजी आमदार दामू नाईक उपस्थित होते. कामत म्हणाले, गोवा महानगरपालिका आणि नगरपालिका कायद्यात गुप्त मतदान घेण्याविषयी कोणतीही तरतूद नाही.
नगराध्यक्ष किंवा उपनगराध्यक्ष यांच्या विरोधात अविश्वास ठराव आल्यास विशेष बैठक बोलावण्याची तरतूद आहे, पण मतदान गुप्त पद्धतीने घेण्याचा उल्लेख नाही. ज्या पक्षाचे संख्याबळ जास्त त्यांचाच नगराध्यक्ष किंवा उपनगराध्यक्ष किंवा सरपंच आणि उपसरपंच होतो. मात्र, विरोधक लोकांची दिशाभूल करत आहेत.
सरकारच्या अध्यादेशामुळे स्थानिक स्वराज्य संस्था अधिक बळकट होतील. तसेच कामकाजही सुधारेल. आमच्याकडे स्पष्ट बहुमत आहे. आमच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या सदस्यांनी आमच्या उमेदवारालाच मतदान करावे हे अपेक्षित आहे. मग गुप्त मतदान करण्याची गरजच काय, असा सवालही कामत यांनी केला.
दरम्यान, यावेळी माजी आमदार दामू नाईक म्हणाले, की सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे. काही स्वंयघोषित विरोधी पक्षनेते सरकारवर आगपाखड करत आहेत. काही ना काही कारणाने माध्यमांतून झळकण्याची त्यांची धडपड सुरू आहे. सरकार अवैध कामांवर कारवाई करत आहे.
राज्यात देशद्रोही कारवाया करणाऱ्या संस्था किंवा संघटनांना थारा दिला जाणार नाही. अशा संस्था किंवा संघटनांना पैसा पुरवणाऱ्या आणि त्यांना आसरा देणाऱ्या प्रत्येकाची चौकशी होईल, गेल्या पाच वर्षाच्या काळात सरकारने सर्वाधिक अमलीपदार्थविरोधी कारवाया केल्या आहेत.
विजय सरदेसाईंना धक्का
मॉडेल मडगाव पॅनलच्या 7 आणि सरदेसाई यांच्या फातोर्डा फॉरवर्डच्या एका नगरसेवकाने आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय लढाईत आमदार कामत यांनी आपले वर्चस्व सिद्ध करून सरदेसाई यांना धक्का दिला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.