Goa Congress | Amit Patkar  Dainik Gomantak
गोवा

PM Rozgar Mela: नियुक्तीपत्र हे लोकांना फसवण्याचे नाटक- अमित पाटकर

PM Rozgar Mela: गोव्यात नियुक्तीपत्रे दिलेल्या सर्व उमेदवारांची माहिती सार्वजनिक करा, अशी मागणी पाटकरांनी केली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Congress: गृहमंत्री अमित शहा यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला ‘प्रधानमंत्री रोजगार मेळावा’ हा आणखी एक जुमला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यात नियुक्तीपत्रे दिलेल्या सर्व उमेदवारांची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे.

काल राज्यात शासनातर्फे आयोजित रोजगार मेळावा कार्यक्रमात काही उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. त्यावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी, हा रोजगार मेळावा म्हणजे लोकांना फसवायचे नाटक होते, असा टोला हाणला आहे.

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी नियुक्तीपत्रे सुपूर्द केलेल्या विविध सरकारी खात्यांतील उमेदवारांच्या निवड प्रक्रियेबद्दल गोव्यातील सुशिक्षित तरुणांना जाणून घ्यायचे आहे. निवडलेल्या सर्व उमेदवारांची नावे, पत्ता, शैक्षणिक पात्रता यासह सर्व माहिती गोमंतकीयांना कळू द्या.

त्या सात पोस्टमनचे काय?

कालच्या रोजगार मेळाव्यात टपाल खात्यासाठी काही लोकांची भरती झाली आहे. आठ ते दहा वर्षे काम केल्यानंतर अचानक सेवेतून काढून टाकलेल्या फोंड्यातील सात पोस्टमनचे काय झाले, असा सवाल पाटकर यांनी केला असून, याविषयी त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे.

माहिती वृत्तपत्रांत प्रसिद्ध करा

जे लोक कंत्राटी पद्धतीने काम करत होते, त्यांना आता कायमस्वरूपी नियुक्तीची पत्रे देण्यात आली आहेत. हे जर खरे असेल तर मोदी सरकार नोकऱ्या देत नसून केवळ सेवा नियमित करत असल्याचा दावा पाटकर यांनी केला. गोव्यातील तरुणांना प्रधानमंत्री रोजगार मेळाव्यात नियुक्तीपत्रे दिली असतील तर ते उमेदवार कधी, कसे निवडले हे सांगणे आवश्यक आहे, असे पाटकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT