Goa BJP
Goa BJP Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: 25 हून अधिक उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता

दैनिक गोमन्तक

पणजी : गोवा विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काही पक्षानी तर दुसरी यादी देखील जाहीर केली आहे अश्यातच भाजपने अद्याप आपली पहिली (Sadanand Shet Tanawade) यादी देखील जाहीर केली नाही. हा मोठा चर्चेचा मुद्दा ठरत आहे. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपकडून बुधवारपर्यंत 25 हून अधिक उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. (Goa BJP first list of more than 25 candidates likely to be announced)

या यादीत फक्त एकच उमेदवार रिंगणात असलेल्या मतदारसंघांचा (Goa Constituencies) समावेश असण्याची शक्यता आसून, दुसरी यादी ज्यात एकापेक्षा जास्त इच्छुक असलेल्या मतदारसंघांचा समावेश असू शकतो, पक्षाकडून घेण्यात आलेल्या नवीन सर्वेक्षण आणि ग्राउंड रिपोर्ट्सचा आढावा घेतल्यानंतर यादी जाहीर केली जाईल. भाजप (BJP) कोअर कमिटी आणि पक्षाच्या राज्य निवडणूक (Goa Assembly Election 2022) समितीने नावे निवडली असून ती केंद्रीय समितीसमोर ठेवण्यात येणार आहेत.

दिल्लीतील बैठकीला असणार या नेत्यांची उपस्थिती

दिल्लीतील बैठकीला मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, तानावडे आणि सरचिटणीस (संघटन) सतीश धोंड उपस्थित राहण्याची शक्यता आहे. कळंगुटचे माजी आमदार मायकल लोबो यांच्या पक्षातून बाहेर पडल्यानंतर भाजपने अद्याप उमेदवार निश्चित केलेला नाही. माजी मंत्री आणि आमदार मिलिंद नाईक यांच्याशी संबंधित कथित सेक्स स्कँडलच्या अलीकडील वादामुळे मुरगावला दुसऱ्या यादीत घोषित केले जाऊ शकते, त्याचप्रमाणे मंत्री आणि आमदार दीपक पाऊसकर यांच्यावर सार्वजनिक बांधकाम विभागातील नोकऱ्या घोटाळ्याच्या आरोपामुळे सावर्डे ला विलंब होऊ शकतो. भाजपच्या चार आमदारांनी यापूर्वीच आमदारकीचा राजीनामा दिला असून त्यात तीन अल्पसंख्याक समाजातील आहेत.

निवडणुकीच्या पूर्वसंध्येला भाजप सोडलेल्या आमदार

निवडणुकीच्या पूर्वसंध्येला भाजप सोडलेल्या आमदारांमध्ये लोबो, अलिना साल्डाना, वास्कोचे माजी आमदार कार्लोस आल्मेडा आणि मायेचे माजी आमदार प्रवीण झांट्ये यांचा समावेश आहे. लोबो आणि आल्मेडा हे काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत, तर साल्दान्हा या आप मध्ये तर झांट्ये हे एमजीपीमध्ये सामील झाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

Goa Crime News: भागीदारीसाठी गुंतवलेल्या पैशांमध्ये केली अफरातफर; कळंगुट पोलिसांनी सहाजणांविरुद्ध नोंदवला गुन्हा

SCROLL FOR NEXT