Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: राहुल गांधींच्या 'त्या' विधानाचा तानावडे यांच्याकडून निषेध

Goa BJP: विरोधकांना नारी शक्तीच्या जनाधारातून उत्तर मिळेल

गोमन्तक डिजिटल टीम

Goa BJP: कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मुंबई येथील सभेत शक्तीविषयी विचित्र विधान केल्याचा दावा करत त्या विधानाचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी आज पत्रकार परिषद घेत निषेध केला.

लोकसभा निवडणुकीतील नारी शक्तीच्या जनाधारातूनच त्यांच्या विधानाला उत्तर मिळेल, असे प्रत्युत्तरही तानावडे यांनी दिले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे दक्षिण गोवा निवडणूक संयोजक विनय तेंडुलकर व आमदार संकल्प आमोणकर होते.

तानावडे म्हणाले, महिला शक्तीने नेहमीच भाजपची साथ दिली आहे. महिला ही मोठी शक्ती आहे, असे आम्ही मानतो. ही शक्ती नष्ट करण्याचे स्वप्न कॉंग्रेस पाहत आहे. गांधी यांनी त्याचाच उच्चार केला आहे. राज्य व राष्ट्रीय पातळीवर महिला ही आमची ताकद आहे.

कॉंग्रेस त्याचमुळे महिला विरोधी आहे. त्यांचे राज्यात व राष्ट्रीय पातळीवर सरकार असताना, संसदेच्या दोन्ही सभागृहांत स्पष्ट बहुमत असताना त्यांना (कॉंग्रेसला) महिलांना राजकीय आरक्षण देण्याचे कधी सुचले नाही.

कॉंग्रेस केवळ महिला सशक्तीकरणावर भाषणे देत राहिली. भाजपने नव्या संसद भवनात महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी देत कामकाजाला सुरुवात केली. यावरून भाजप महिला शक्तीला कसे वंदन करतो ते दिसून येते.

तिहेरी तलाक रुढी भाजपने कायद्याने रद्द केली. यामुळे अनेक मुस्लीम महिलांना दिलासा मिळाला. तलाक देण्याचे प्रमाण २०१४ च्या तुलनेत २४ टक्क्याने घटले अशी आकडेवारी देऊन ते म्‍हणाले, महिला या शक्तीचे रुप आहेत, असे तानावडे म्हणाले.

भाजपच्या गूढ ‘शक्ती’चा पर्दाफाश केला: रिबेलो

मध्यरात्री उपमुख्यमंत्र्यांच्या मोबाईलवरून अश्लील चित्रफीत प्रसारित करण्याची गूढ शक्ती भाजपकडे आहे. देशाचे नेते राहुल गांधी भाजपच्या अशा वाईट व विकृत ‘शक्ती’बद्दलच बोलले, असा सणसणीत टोला काँग्रेस नेत्या आणि जिल्हा पंचायत सदस्य मिशेल रिबेलो यांनी हाणला आहे.

भाजपचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी मुंबईतील भव्य सभेतील राहुल गांधी यांच्या भाषणाला लक्ष्य करून केलेल्या दिशाभूल करणाऱ्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मिशेल रिबेलो यांनी भाजपला ‘मास्टर मॅनीप्युलेटर’ म्हटले आहे.

आमचे नेते राहुल गांधी कळंगुटचे थायलंडमध्ये रूपांतर करणाऱ्या भाजपच्या त्या ‘गूढ शक्ती’ बद्दल बोलले. गोव्याचे ‘क्राइम हब’ मध्ये रूपांतर करणाऱ्या भाजपच्या शक्तीबद्दल त्यांनी भाष्य केले, असे मिशेल रिबेलो यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

Raechelle Banno: 'IFFI ला माझ्या चित्रपटाने सुरुवात झाली हे पाहून आनंद झाला'; बेटर मॅनच्या अभिनेत्रीने भूमिकेच्या दबावाबद्द्ल मांडले मत

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

SCROLL FOR NEXT