Goa BJP Dainik Gomantak
गोवा

Goa ZP Election: जि. पं. निवडणुकीसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर, उत्तर आणि दक्षिण गोव्यात 10 उमेदवार निश्चित; कोणाला मिळाली संधी?

Goa BJP Second List: आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असताना भारतीय जनता पक्षाच्या राज्य निवडणूक समितीने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली.

Manish Jadhav

पणजी: आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असताना भारतीय जनता पक्षाच्या राज्य निवडणूक समितीने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायतमधील महत्त्वाच्या दहा (10) मतदारसंघांसाठीच्या उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली. भाजपच्या राज्य निवडणूक समितीने सर्वसाधारण, महिला, ओबीसी आणि अनुसूचित जमाती आरक्षित जागांवर योग्य संतुलन साधत ही नावे जाहीर केली.

उत्तर गोवा निवडणुकीसाठी सहा उमेदवार

उत्तर गोव्यातील सहा मतदारसंघांसाठी भाजपने उमेदवार दिले आहेत. यात तरुण आणि अनुभवी चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

  • हरमल (Arambol) - महिला राखीव: या जागेसाठी मनीषा संतोष कोरकणकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

  • शिवोली (Siolim) - सर्वसाधारण: या सर्वसाधारण जागेवरुन महेश मनोहर गोवेकर निवडणूक लढवतील.

  • हळदोण (Aldona) - सर्वसाधारण: भाजपच्या वतीने या मतदारसंघात श्री. सुभाष कृष्णा मोराजकर यांना उमेदवारी मिळाली आहे.

  • हणजूण (Anjuna) - ओबीसी राखीव: ओबीसी प्रवर्गातून नारायण लाडू मांद्रेकर हे उमेदवार असतील.

  • चिंबल (Chimbel) - महिला राखीव: या जागेसाठी गौरी प्रमोद कामत यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

  • सांत इस्तेव्ह (St. Lawrence) - महिला (ओबीसी) राखीव: या राखीव जागेसाठी पौलिना ऑलिव्हेरा @ फ्रान्सिस पो यांना संधी देण्यात आली.

दक्षिण गोवा निवडणुकीसाठी चार उमेदवार

दक्षिण गोव्यातील चार मतदारसंघांसाठी भाजपने उमेदवार निश्चित केले आहेत. यात प्रामुख्याने अनुसूचित जमाती (ST) आरक्षित महिला जागेचा समावेश आहे:

  • धारबांदोडा (Dharbandora) - सर्वसाधारण: या सर्वसाधारण जागेवरुन रुपेश रामनाथ देसाई भाजपचे प्रतिनिधित्व करतील.

  • रिवण (Rivona) - महिला (एसटी) राखीव: ही जागा अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव असून, येथून राजश्री राजेश गावकर यांना उमेदवारी मिळाली.

  • बार्शे (Barcem) - महिला राखीव: या महिला राखीव जागेसाठी अंजली अर्जुन वेळीप यांच्या नावावर पक्षाने विश्वास दाखवला आहे.

  • पैंगिण (Poinguinim) - सर्वसाधारण: या सर्वसाधारण जागेसाठी अजित @ अजय शांताराम लोलयेकर यांना भाजपने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

भाजपने जाहीर केलेली ही दुसरी यादी असून यामध्ये दहा मतदारसंघांचा समावेश आहे. भाजपने महिला, ओबीसी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना प्रतिनिधित्व देत सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. या यादीमुळे गोव्यात जिल्हा पंचायत निवडणुकीची रणधुमाळी अधिक तीव्र होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pooja Naik: 'पूजा नाईकचे सर्व दावे खोटे!' गोवा पोलिसांच्या तपासावर मुख्यमंत्र्यांचा शिक्कामोर्तब; म्हणाले, तपास अजूनही थांबलेला नाही...

Shirdao Murder Case: शिरदोन दुहेरी हत्याकांडप्रकरणी दोषींना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; गोवा खंडपीठाच्या निर्णयाला दिली स्थगिती!

Virat Kohli: रोहित खेळणार, पण विराट नाही! 'या' स्पर्धेत सहभागी होण्यास किंग कोहलीचा नकार, रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

Smriti Mandhana Wedding: अफवांवर पडदा! 7 डिसेंबरला स्मृती मानधना लग्नबंधनात अडकणार? भावाने केला मोठा खुलासा

Goa Crime: ब्रेकअपनंतर ब्लॅकमेलिंग! खासगी फोटो-व्हिडिओ व्हायरल करत खंडणीची मागणी, गोवा पोलिसांनी धारवाड येथून प्रियकराला ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT