Goa BJP and Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: भाजप व कॉंग्रेस दोन्ही राष्ट्रीय पक्ष सध्या बंडखोरीच्या विळख्यात

उमेदवारीवरून सुंदोपसुंदी: कार्यकर्ते संभ्रमात

दैनिक गोमन्तक

काणकोण: काणकोण मतदार संघात उमेदवारीवरून कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये बंडाचे राजकारण सुरू झाले आहे. त्यामुळे 2017 च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

भाजप व कॉंग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षाला सध्या मतदारसंघात बंडखोरीला सामोरे जावे लागत आहे. भाजपची उमेदवारी नाकारल्याने माजी आमदार तथा उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरून बंड पुकारून अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.त्यांना भाजप मंडळाचे अध्यक्ष नंदीप भगत,युवा मोर्चाचे अध्यक्ष सतीश गोसावी व सदस्यांनी जाहीर समर्थन देऊन मंडळात उभी फूट पाडली आहे.(Goa BJP and Congress Both are currently in throes of insurgency)

गेल्या निवडणुकीत Goa Election पक्षाने उमेदवारी विजय पै खोत यांना दिल्यानंतर माजी मंत्री रमेश तवडकर यांनी हाच मार्ग चोखाळला होता त्यामुळे भाजपच्या अधिकृत उमेदवाराला हार खावी लागली होते.त्यावेळचा शिमगा संपला तरी कवित्व अजूनही शिल्लक आहे. त्यासाठी माजी आमदार विजय पै खोत यांनी अपक्ष उमेदवारीचे रणशिंग फुंकले आहे.

काणकोणचे Canaona माजी आमदार आणि माजी उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्याना भाजपचे मंडळ अध्यक्ष नंदीप भगत व युवा मोर्चाचे अध्यक्ष सतीश गोसावी यांनी कार्यकर्त्यांसह उमेदवारी दाखल केल्याबद्धल अभिनंदन केले त्यामुळे मंडळात उभी फूट पडल्याचे सिद्ध झाले आहे. कार्यकर्त्याचा वाढता पाठिंबा यामुळे यंदा किमान 14 हजार मते घेऊन निवडून येणार आहे.गेल्या निवडणुकीत 11 हजारांपेक्षा जास्त मते घेऊन फर्नाडिस निवडून आले होते.

भाजप Goa BJP मंडळाचे पदाधिकारी उमेदवारी न मिळाल्याने नाराज झाले आहेत.त्यांनी मला बिनशर्त पाठिंबा देण्याचे ठरविले आहे ते आपल्या निर्णयावर ठाम राहतील हा, विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.उमेदवारी सादर करताना त्याच्या सोबत जिल्हा पंचायत सदस्य शोभना वेळीप,लोलयेचे सरपंच सचिन नाईक, नगरसेवक शुभम कोमरपंत,धीरज नाईक गावकर उपस्थित होते.त्याचप्रमाणे मामलेदार कार्यालयाबाहेर लोलयेचे पंच अजय लोलयेकर,निशांत प्रभू देसाई,पैंगीणचे सरपंच जगदीश गावकर,गावडोंगरीच्या सरपंच अंजली वेळीप, उपसरपंच एल्डा फर्नांडीस व अन्य पंचायतीचे सरपंच,माजी सरपंच पंच उपस्थित होते.

त्याचप्रमाणे भाजपची पारंपारिक मते अधिकृत उमेदवार तवडकर,अपक्ष उमेदवार विजय पै खोत व माजी उपसभापती इजिदोर फर्नांडीस यांच्यामध्ये विभागून जाणार आहेत.या बंडखोरीत ज्या उमेदवाराकडे वैयक्तिक मतपेटी आहे, तोच बाजी मारून पुढे जाणार आहे.मात्र रमेश तवडकर यांनी काणकोण पालिकेच्या सत्ताधारी सात नगरसेवकांचा पाठिंबा मिळविण्यात यश प्राप्त केले.

काँग्रेसच्या मतांची होणार विभागणी

दुसऱ्या बाजूला उमेदवारी न मिळाल्याने कॉंग्रेसच्या Goa Congress प्रदेश सरचिटणीस पदावर असलेले महादेव देसाई यांनी पक्षाचा राजीनामा देऊन तृणमूल कॉंग्रेस पक्षात प्रवेश करून बंड पुकारले आहे.ते या पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढविणार आहेत.आपल्याला उमेदवारी नाकारण्यास प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचा हात असल्याचे ते सांगत आहेत.काणकोणात कॉंग्रेसचे सुमारे पाच हजार पारंपारिक मतदार आहेत, मात्र महादेव देसाई निवडणुकीत उतरल्यास कॉंग्रेसच्या मतांचे विभाजन होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT