Goa BITS Pilani Students bags 60 lac rupees annual package Dainik Gomantak
गोवा

Goa BITS Pilani: राज्यातील विद्यार्थ्याला वर्षाला 60 लाख पगार! देशांतर्गत देऊ केलेले सर्वोच्च पगाराचे पॅकेज

Goa BITS Pilani: आंतरराष्ट्रीय संस्थेची ऑफर: बिट्‍स पिलानीच्या ऋतुराज गोडसे याचे भाग्य उजळले

गोमन्तक डिजिटल टीम

Goa BITS Pilani: बिट्‍स पिलानी संस्थेच्या के. के. बिर्ला गोवा कॅम्पसच्या एका विद्यार्थ्याला प्लेसमेंटमधून वार्षिक 60 लाख 80 हजार रुपये पगार देऊ करण्यात आला आहे.

हे पॅकेज गेल्या वर्षी देशांतर्गत देऊ केलेल्या सर्वोच्च पगारापेक्षा 35 टक्क्यांहून जास्त आहे, असे संस्थेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

ऋतुराज गोडसे असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे. त्याला डी. ई. शॉ या बहुराष्ट्रीय गुंतवणूक व्यवस्थापन फर्मने हे पॅकेज देऊ केले आहे.

वर्षाला 40 लाख रुपये पगार घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट झाली आहे. बिट्‍स पिलानी गोवा कॅम्पसमध्ये सुमारे 280 कंपन्या आल्या होत्या. त्यात गुगल, मायक्रोसॉफ्ट, उबेर, डीई शॉ, टेक्सास इन्स्ट्रूमेंटस्, एक्सॉन मोबाईल आदी कंपन्यांचा समावेश होता.

79 विद्यार्थ्यांना 40 लाखांच्या नोकऱ्या

बिट्‍स पिलानीच्या के. के. बिर्ला गोवा कॅम्पसमध्ये 926 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्लेसमेंटसाठी नोंदणी केली होती.

संस्थेतील भारत आणि दुबईसाठीचे मुख्य प्लेसमेंट अधिकारी जी. बालसुब्रमण्यम यांनी ही माहिती दिली.

बालसुब्रमण्यम यांच्या माहितीनुसार, नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी 79 हून अधिक विद्यार्थ्यांना वर्षाला ४० लाख रुपयांपेक्षा जास्त पगार मिळाला आहे.

संस्थेच्या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये ही आत्तापर्यंतची सर्वोच्च विद्यार्थी संख्या आहे.

नोकरीची संधी मिळालेले विद्यार्थी

या प्लेसमेंटमध्ये जगातील दिग्गज कंपन्यांकडून मोठ्या संख्येने ऑफर आल्या. ॲमेझॉनने - 32 विद्यार्थ्यांना, उबेरने 16, मायक्रोसॉफ्टने17, नुटानिक्सला 13 आणि गुगलने 7 विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पशुवैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाचं आमिष; मांगोरहिल येथील महिलेला 12.86 लाखांचा गंडा, महाराष्ट्रातील 4 जणांवर गुन्हा दाखल

Goa Winter Updates: राज्यात थंडीचा कडाका वाढला

Lionel Messi In India: 3 दिवस, 4 शहरं… मेस्सी भारत दौऱ्यावर! कधी, कुठे आणि कोणत्या कार्यक्रमात उपस्थित राहणार? पाहा संपूर्ण वेळापत्रक

Goa ZP Election 2025: भाजप 40, मगोच्या वाट्याला 3 जागा तर सात जागांवर अपक्ष उमेदवार; सत्ताधाऱ्यांचा फॉर्म्युला फिक्स

Watch Video: संघ हरला म्हणून राग आला, चाहत्यांनी स्टेडियमच पेटवलं; क्षणात सगळं जळून खाक, आग लावणारे 15 वर्षांखालील मुलं

SCROLL FOR NEXT