काणकोण: भगवान बिरसा मुंडा यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त आयोजित समारोप कार्यक्रमाच्या शोभायात्रेत राज्यभरातून सुमारे आठ हजार मोटरसायकलस्वार सहभागी होणार आहेत. त्यात बार्देश, तिसवाडी, डिचोली, साखळी, फोंडा, धारबांदोडा, सांगे, कुडचडे, केपे, काणकोण, बाळ्ळी व कुंकळ्ळी येथील युवकांचा सहभाग असेल.
मडगाव येथील रवींद्र भवनात जनजाती समाजातील अभियंते, सनदी अधिकारी, डॉक्टर व विचारवंतांचे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात २०३७ पर्यंत राज्यातील जनजाती समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी ‘रोडमॅप’ तयार केला जाणार आहे.
शिवाय राज्यातील शंभर शाळांमध्ये १० ते १५ नोव्हेंबरदरम्यान भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनावर विविध स्पर्धा, तसेच साखळी, फोंडा, कुडचडे, काणकोण येथे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
कला व संस्कृतीमंत्री डॉ. रमेश तवडकर यांनी सांगितले की, भगवान बिरसा मुंडा यांनी अठराव्या वर्षी अन्यायाविरुद्ध आवाज उठवून देशाला नवी दिशा दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनजाती युवकांना संघर्षाचा आणि संघटनाचा मंत्र देण्यासाठी ही जयंती देशभर साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्यक्रमाला उत्तर गोवा जिल्हा पंचायत सदस्य धाकू मडकईक उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनुसूचित जमातींना प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. आदिवासी समाजातील आठ केंद्रीय मंत्री, राष्ट्रपतिपदावर आदिवासी महिला, आणि ‘श्री अन्न’ दर्जामुळे पारंपरिक उत्पादनांना सन्मान प्राप्त झाला आहे. गोव्यात अनुसूचित जमातींसाठी निवासी शाळा स्थापन केली असून कल्याणकारी योजनांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही.
- रमेश तवडकर, कला-संस्कृतीमंत्री
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.