Goa Bird Checklist Dainik Gomantak
गोवा

'Goa Bird Checklist'मध्ये नव्या प्रजातींची नोंद; पाच नव्या पक्ष्यांचा समावेश, इंडियन बड्‌र्सच्या शोधपत्रिकेतील अहवाल प्रसिद्ध

Indian Birders Report: गोवा हे आता केवळ पर्यटकांचेच नव्हे, तर जगभरातील पक्षी निरीक्षकांचेही आवडते केंद्र ठरले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोवा हे आता केवळ पर्यटकांचेच नव्हे, तर जगभरातील पक्षी निरीक्षकांचेही आवडते केंद्र ठरले आहे. ‘गोवा बर्ड चेकलिस्ट’च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आठव्या आवृत्तीनुसार गोव्यात पाच नव्या पक्षी प्रजातींची नोंद झाली आहे.

‘इंडियन बर्ड्स’ या वैज्ञानिकदृष्ट्या अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या शोधपत्रिकेत हा महत्त्वाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. ‘अरण्या एन्व्हायर्नमेंट रिसर्च ऑर्गनायझेशन’चे संशोधन प्रमुख प्रणय वैद्य आणि ‘गोवा बर्ड कन्झर्वेशन नेटवर्क’चे खजिनदार मंदार भगत यांनी या ऐतिहासिक चेकलिस्टचे लेखन केले आहे.

नव्या आवृत्तीत समाविष्ट झालेल्या पाच प्रमुख पक्ष्यांमध्ये ‘ग्रेलाग गूज’ (हंस), ‘रेड-क्रेस्टेड पोचार्ड’, ‘वेज-टेल्ड शियरवॉटर’, ‘इंडियन कोर्सर’ आणि ‘इंडियन ग्रे हॉर्नबिल’ या प्रजातींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक पक्ष्याची नोंद वैज्ञानिक निकषांवर काटेकोर तपासणी केल्यानंतरच या यादीत समाविष्ट करण्यात आली आहे.

गोव्यात पक्षी संवर्धन केवळ सरकारी पातळीवर किंवा कागदापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर येथील तरुण पिढी आणि महाविद्यालयीन विद्यार्थीही त्यात मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत. ‘कॅम्पस बर्ड काउंट २०२६’ अंतर्गत गोव्यातील १२ नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये पक्षी निरीक्षण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत विद्यार्थ्यांनी तब्बल ११० वेगवेगळ्या पक्षी प्रजातींची यशस्वी नोंद केली.

पर्यावरणीय धोके अन् सूक्ष्म बदल

अहवालात काही पर्यावरणीय धोके आणि सूक्ष्म बदलही समोर आले असून, त्याकडे अभ्यासकांनी गंभीरपणे लक्ष वेधले आहे. नव्या यादीत समाविष्ट झालेले ‘इंडियन कोर्सर’ आणि ‘इंडियन ग्रे हॉर्नबिल’ हे पक्षी प्रामुख्याने अत्यंत कोरड्या, उष्ण आणि कमी पाऊस असलेल्या खुल्या मैदानी प्रदेशात आढळतात.

कर्नाटकातील हंपीसारख्या दुष्काळी भागातील हे पक्षी आता गोव्यात स्थिरावू लागले आहेत. दुसरीकडे, कोकण किनारपट्टीच्या दमट हवामानात राहणाऱ्या स्थानिक पक्ष्यांचे अधिवास धोक्यात येत असल्याची नोंदही या अहवालात करण्यात आली आहे.

निसर्गातील बदल हा केवळ ऋतुचक्रापुरता मर्यादित नसून, गोव्याच्या हवामानात होत असलेल्या अंतर्गत बदलांचा तो संकेत तर नाही ना, यावर आता सखोल संशोधन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Bomb Blast: पाकिस्तान हादरलं! खैबर पख्तूनख्वामध्ये नमाजादरम्यान रक्ताचा सडा; भीषण आत्मघाती हल्ल्यात 16 ठार, 50 हून अधिक जखमी

Abhishek Sharma Shiva Celebration: 'प्लेयर ऑफ द सिरीज' ठरल्यानंतर अभिषेक शर्माचा मोठा खुलासा, सेंच्युरीनंतरच्या 'शिव सेलिब्रेशन'विषयी स्पष्टच सांगितलं; म्हणाला...

Porvorim Traffic Congestion: 'उन्‍नत'मार्गावर प्रगती, रस्त्यावर मात्र कोंडी

Jos Buttler World Record: 9 शतके, 107 अर्धशतके अन् 15000 धावा! टी-20 मध्ये बटलरने रचला नवा इतिहास; अशी कामगिरी करणारा बनला जगातील पहिलाच फलंदाज VIDEO

Mapusa Kidnapping Case: दोन अपहरण प्रकरणे, दोन राज्यात तपास अन् चौघांची सुखरुप सुटका, म्हापसा पोलिसांची धडक कारवाई; एक संशयित गजाआड

SCROLL FOR NEXT