Goa Biodiversity Postcards Dainik Gomantak
गोवा

Goa Postcards: मलय वृक्षपरी, गवा रेडा, उडता सोनसर्प! ‘पोस्ट कार्ड’ वर झळकतेय गोव्याची जैवविविधता

Goa Biodiversity Postcards: गोव्यातील जैवविविधतेच्या वैविध्यपूर्ण पैलुंचे दर्शन घडवणाऱ्या नैसर्गिक संचितांचा आविष्कार पोस्ट कार्डाच्या माध्यमातून डाॅ. माधव गाडगीळ यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.

Sameer Panditrao

गोव्यातील जैवविविधतेच्या वैविध्यपूर्ण पैलुंचे दर्शन घडवणाऱ्या नैसर्गिक संचितांचा आविष्कार पोस्ट कार्डाच्या माध्यमातून डाॅ. माधव गाडगीळ यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. केरी–सत्तरी येथील विवेकानंद पर्यावरण जागृती फौज (VEAB) ने सह्याद्री पर्वतरांगातील दुर्मिळ व स्थानिक प्रजातींवर आधारित १४ शैक्षणिक पोस्टकार्डांची निर्मिती केली होती.

या नैसर्गिक संचितांचे पोस्ट कार्डांच्या माध्यमातून प्रकाशन पुणे येथील जागतिक जीव शास्त्रज्ञ आणि पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्या हस्ते पुणे येथे करण्यात आले. सह्याद्री संवर्धन कार्यकर्ते राजेंद्र केरकर आणि पर्यावरण कार्यकर्ते संकेत नाईक, गजानन शेट्ये व मधू गावकर यांचीही यावेळी उपस्थिती होती.

‘पोस्टकार्ड’ मालिकेत सह्याद्रीतील दुर्मिळ प्रजातींचा समावेश आहे. यात गोव्याचा मानदंड अग्निकंठी बुलबुल, मलय वृक्षपरी (फुलपाखरू), गवा रेडा, मलय कर्णा, आंबोली झुडूप बेडूक, लाजवंती, मलय विहार बेडूक, ॲटलास पतंग, उडता सोनसर्प, गोवा छाया नर्तक, मलय चापडा, पांढऱ्या छातीचा खंड्या, पिचू पोपट, भीमपंखी फुलपाखरू यांचा समावेश आहे.

पोस्टकार्डचा उद्देश विद्यार्थ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत पर्यावरण साक्षरता वाढवणे आणि जैवविविधतेचे संरक्षण प्रोत्साहित करणे हा आहे. वैज्ञानिक अभ्यास, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा सहभाग या तिन्हींच्या संयोगातून साकारलेला हा उपक्रम गोव्यातील जैवविविधतेच्या संरक्षणाला नवी दिशा दर्शन करण्यास उपयुक्त ठरेल असे पर्यावरण कार्यकर्ते मधु गावकर यांनी सांगितले.

‘पोस्टकार्ड’वरील छायाचित्रे रमण कुलकर्णी, पराग रांगणेकर, गजानन शेटये, रमेश झर्मेकर यांनी टिपलेली आहेत. या उपक्रमाद्वारे पर्यावरणाबद्दल लोकसहभाग निर्माण करणे आणि सह्याद्रीतील निसर्गसंपत्तीचे जतन करणे हे ‘फौज’चे ध्येय असल्याचे या प्रसंगी अधोरेखित करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आंबा खाताय की विष? कॅल्शिअम कार्बाइडचा नफेखोरीसाठी वापर; ग्राहकांच्या जिवाशी खेळ सुरु

Goa Police: गोव्यातील 25 मोठे गुन्हे क्राईम ब्रांचच्या ताब्यात ! गुंतागुंतीच्या प्रकरणांचा तपास आता वेगाने; पोलीस ठाण्यांतून गुन्हे वर्ग

पंतप्रधानांना कोर्टात खेचण्याची भाषा अन् तासाच न्यायाधीशाची उचलबांगडी, पाकिस्तानात रंगलं नाट्य; लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप

Mopa Airport : मोपा विमानतळ विकास की कासारवर्णे गावाचा विनाश ? ग्रामस्थ संतप्त ; पावसाळ्यात उद्‍भवते पूरसंकट

Yuti Yog 2026: "शुक्र-गुरुच्या युतीने चमकणार नशिबाचा तारा!" पैसा, प्रतिष्ठा अन् मालमत्तेचे व्यवहार होणार फत्ते; 4 राशींसाठी युती योग ठरणार वरदान

SCROLL FOR NEXT