Goa: Big announcements made by Chief Minister Pramod Sawant for tribal community Dainik Gomantak
गोवा

Goa: आदिवासी समाजासाठी मुख्यमंत्र्यांनी केल्या मोठ्या घोषणा

World Tribal Day: आदिवासी समाजाची संस्कृती जपण्यासाठी सांगे येथे आदिवासी संशोधन केंद्राची स्थापना केली जाईल असे मुख्यमंत्र्यानी जाहीर केले.

दैनिक गोमन्तक

आपले सरकार आदिवासी समाजाच्या (Tribal Communities) विकासासाठी कार्यरत आहे. सरकारने आदिवासी समाजासाठी तीन योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्त गोवा राज्य अनुसुचित जाती व जमाती आयोग व आदिवासी विकास खात्याने मडगावी रविन्द्र भवनात आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणुन ते बोलत होते. (Goa government will take big decisions for the development of the tribal community)

आदिवासी समाजाच्या चाली-रिती, परंपरा, संस्कृती याचे जतन करणे व त्याची माहिती युवा पिढीला मिळावी या हेतुन सरकार एक दोन महिन्यातच सांगे येथे आदिवासी संशोधन केंद्राची स्थापना केली जाईल असे मुख्यमंत्र्यानी जाहीर केले. शिवाय आदिवासी समाजाची माहिती सर्वांना व्हावी या साठी आदिवासी संग्रहालय फर्मागुडी येथे सुरु करण्यात येईल तसेच पर्वरी येथे गोमंत गौड समाजाच्या जागेत आदिवासी भवन इमारत बांधण्यात येईल अशा घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्या. या भवनात सरकारचे आदिवासी विकास खाते, महामंडळ व आयोग हे एकाच इमारतीत कार्यरत होईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. भवनाचा पाया 13 ऑगस्ट रोजी घालण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

सरकारने आदिवासी समाजासाठी ज्या योजना सुरु केल्या आहेत त्यासाठी जागृती होणे गरजेचे आहे. हे काम केवळ सरकारी पातळीवरुन होणार नाही तर जे समाजासाठी स्वेच्छेने कार्यरत आहेत त्यांची सुद्धा ही जबाबदारी असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. आरोग्य व शिक्षणा संबंधीची जागृती होणे अती महत्वाचे असल्याचेही ते म्हणाले.

आदिवासी समाजाला प्रगतीपथावर नेण्यासाठी काय करायला पाहिजे या विचारांचे आदान प्रदान होणे गरजेचे असल्याचे आदिवासी मंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले. आपल्या खात्याने आदिवासी समाजाच्या विधवांच्या मुलांसाठी जी योजना सुरु केली आहे, त्याची रक्कम 1500 वरुन 2500 रुपया पर्यंत वाढविण्याची सरकारची योजना असल्याचे मंत्री गावडे यांनी सांगितले.

अनुसुचित जाती व जमाती आयोगाचे आयुक्त रमेश तवडकर म्हणाले की सद्याच्या परिस्थिती आदिवासी समाजाला डावलुन राज्याची किंवा देशाची प्रगती होऊ शकत नाही. आदिवासी समाजाने संघर्ष करुनच मान्यता मिळविल्याचेही तवडकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT