Satyavati Paryekar, Bicholim  Dainik Gomantak
गोवा

तरुण मुलींना काळाने हिरावले, पदरी दिव्यांग मुलगा; निराधार विधवा महिलेची घरासाठी परवड

मदतीची प्रतीक्षा : नानोड्यात गरीब महिलेचे घर कोसळण्याच्या स्थितीत

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim News: पावसाच्या तडाख्याने पडझड झालेल्या नानोडा येथील एका गरीब महिलेच्या घराला धोका निर्माण झाला आहे. या घराच्या दर्शनी भागाची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून, आतील भिंतीलाही तडे गेले आहेत.

यापुढे आणखी पर्जन्यवृष्टी झाल्यास हे घर कोसळण्याचा धोका असून, भीतीच्या छायेतच ही सत्यवती पर्येकर ही गरीब महिला दिवस कंठत आहे.

दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे पर्येकर यांच्या घराची पडझड झाली. हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणारी ही महिला आता सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत आहे. घर दुरुस्त करण्यासाठी कोणी पुढाकार घेईल का, असे आर्जव ती करत आहे.

खडतर जीवन प्रवास

सत्यवती पर्येकर या विधवा असून त्यांची जीवनगाथा सुन्न करणारी आहे. त्यांच्या पदरी एक मुलगा आहे. मात्र, लहानपणापासूनच तो मंदबुद्धीचा. त्यांच्या दोन तरुण मुलींनाही काळाने हिरावून नेले.

विधवांसाठी असलेल्या सरकारी योजनेतून मिळणारे दोन हजार रुपये आणि मिळेल ते काम करून सत्यवती आपल्यासह मुलाचा सांभाळ करत आहेत. अशा अवस्थेत घराची दुरुस्ती कशी करावी, या विवंचनेत त्या पडल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT