drowning Bicholim Dainik Gomantak
गोवा

Drowning Death: काळाचा घाला! फिट आली अन् तोल गेला; गुडघाभर पाण्यात बुडून 23 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Damodar Naik drowning Bicholim: व्रत पाळण्यासाठी वाठादेव-डिचोली येथील धोंड तळावर आलेला दामोदर (अभिषेक) दलपत नाईक (२३) या धोंड भक्त युवकाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू होण्‍याची घटना गुरुवारी घडली.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली : सोवळे व्रत पाळण्यासाठी वाठादेव-डिचोली येथील धोंड तळावर आलेला दामोदर (अभिषेक) दलपत नाईक (२३) या धोंड भक्त युवकाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू होण्‍याची घटना गुरुवारी घडली.

विशेष म्‍हणजे ‘फिट’ येऊन पडल्‍याने गुडघाभर पाण्‍यात त्‍याचा जीव गेला. मिळालेल्‍या माहितीनुसार, काजीवाडा, विठ्ठलापूर-साखळी येथील रहिवासी असलेला दामोदर हा श्री लईराई देवीचा धोंडभक्त होता.

मागील दोन वर्षांपासून त्याने वाठादेव येथील धोंड तळावर व्रत पाळले होते. यंदा त्याच्या व्रताचे तिसरे वर्ष होते. गुरुवारी सकाळी तो आपल्या वडिलांसमवेत धोंड तळावर आला. व्रतास प्रारंभ करण्यापूर्वी आंघोळीसाठी तो गुडघाभर पाण्यात उतरला. त्यावेळी अचानक तो पाण्यात कोसळला. या दुर्दैवी घटनेमुळे सहकारी धोंडभक्त, नातेवाईक आणि मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे.

पाण्‍याबाहेर काढेपर्यंत झाला उशीर

घटना लक्षात येताच उपस्थित धोंडभक्तांनी दामोदरला तत्काळ पाण्‍याबाहेर काढले. त्यानंतर १०८ रुग्णवाहिकेतून त्याला डिचोली सामाजिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT