Bicholim Fire: डिचोली बाजारातील सहा दुकानांना आग लागून लाखो रुपयांची हानी झाली. ही घटना गुरुवारी रात्री उशिरा 10.25 नंतर घडली.
जुन्या बाजारातील ‘कॅफे ममता’ या हॉटेल समोरील एकाच रांगेत असलेल्या दोन कपड्यांच्या दुकानांना प्रथम आग लागलेली दिसली.
त्यानंतर आणखी दोन दुकानांना एकाएकी आगीने घेरले. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. मदतकार्य वेगाने सुरू करण्यात आले. आग नेमकी कशी लागली त्याचे कारण स्पष्ट झाले नसले तरी ‘शॉर्ट सर्किट’मुळे हा प्रकार घडल्याचा अंदाज आहे.
या संबंधी मिळालेल्या माहिती नुसार बुधवारी रात्री साधारणतः 10.25 ला डिचोली बाजार पेठेतील दुकानांना आग लागली.
अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचेपर्यंत तरुण व्यापारी वर्गाने बाजारपेठेलगतच्या छत्रपती शिवाजी महाराज शाळेच्या विहिरीतून पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला.
डिचोली अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचल्यावर 2 बंबांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य नसल्याने वाळपई, फोंडा, म्हापसा, पणजी येथून बंब आणण्यात आले.
आगीची भीषणता एवढी होती की बाजारपेठेत दोन तास अग्नितांडव सुरूच होते. या घटनेत 2 दुकाने आगीत जळून खाक झाली असून लगतच्या 3-4 दुकानांना आगीची झळ पोहचली आहे.
दरम्यान नगरपालिकेच्या सर्व नगरसेवकांसह नगराध्यक्ष कुंदन फळारी यांनीही मोठे मदतकार्य केले. तसेच डिचोलीचे आमदार डॉ चंद्रकांत शेट्ये, उपजिल्हाधिकारी रोहन कांसकर, मामलेदार राजाराम परब हे सर्वजण घटनास्थळी मदतकार्यासाठी उपस्थित होते.
२ तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. १ बंबाची गाडी रात्रभर घटनास्थळी हजर असेल असे अजित कामत यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.