Bicholim School Dainik Gomantak
गोवा

Bicholim School: डिचोलीतील धक्कादायक घटनेने खळबळ, श्‍‍वासोच्‍छवासाच्या त्रासाने 12 विद्यार्थिनी अस्वस्थ

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim School डिचोली येथील शांतादुर्गा उच्‍च माध्‍यमिक विद्यालयात अकरावीच्‍या वर्गातील 12 विद्यार्थिनींना आज दुपारी १२च्‍या सुमारास अचानक श्वासोच्छ्वासाचा त्रास होऊ लागल्‍याने त्‍यांना तत्‍काळ डिचोली आरोग्‍य केंद्रात दाखल केले.

त्‍यातील 10जणींची प्रकृती गंभीर वाटल्‍याने त्‍यांना म्‍हापसा येथील उपजिल्‍हा रुग्‍णालयात नेले होते. त्यापैकी आठ विद्यार्थिनींना सायंकाळी उशिरा उपचारानंतर घरी पाठवण्यात आले. या प्रकरणात ‘पेपर स्प्रे’चा वापर झाला असून काही विद्यार्थी गुंतल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

त्यांनी तसे विद्यालयाच्या प्राचार्यांनाही कळवले आहे. विद्यालयाच्या व्यवस्थापनानेही चार विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

पालकांनी या प्रकाराबद्दल संताप व्‍यक्‍त केला असून याप्रकरणी व्यवस्थापन मंडळाने सखोल तपास करावा आणि प्रकरणाचा उलगडा करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

अस्वस्थ विद्यार्थिनींना जिल्हा इस्पितळात दाखल केल्याची माहिती मिळताच आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी तेथे धाव घेऊन विद्यार्थिनींची विचारपूस केली आणि चौकशीचे आदेश दिले.

वर्ग सुरू असतानाच हा प्रकार घडल्‍याने आश्‍‍चर्य व्‍यक्‍त केले जात असून, नेमके काय घडले याविषयी अद्याप कोणताही खुलासा करण्‍यात आलेला नाही. काँग्रेस नेत्यांच्‍या शिष्‍टमंडळानेही इस्‍पितळात जाऊन विद्यार्थिनींच्‍या प्रकृतीची चौकशी केली.

पेपर स्‍प्रे म्‍हणजे काय?

‘पेपर स्‍प्रे’ हा अडचणीच्‍या प्रसंगी आत्‍मसंरक्षणासाठी वापरण्‍यात येतो. या मिरपूड स्प्रेमधील सक्रिय घटक ‘ओलिओरेसिन कॅप्सिकम’ हे अनेक प्रकारच्या गरम मिरच्यांमध्ये आढळणारे नैसर्गिक तेल आहे.

शिवाय त्‍यातील एक घटक अत्‍यंत दाहक असतो, ज्यामुळे डोळे आणि श्वसनमार्गाचा श्लेष्मल पडदा फुगतो. त्यामुळे प्रचंड वेदना होतात तसेच श्‍‍वास घेण्‍यास त्रास होतो. काहींना तात्पुरते अंधत्वदेखील येऊ शकते.

खुलासा करा !

पेपर स्प्रे’चा (मिरी) वापर झाल्‍याने हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्‍यक्‍त करण्‍यात येत आहे.

शिक्षण खात्याने या घटनेची गंभीर दखल घेतली असून त्यांनी शाळा व्यवस्थापनावर या प्रकरणी कारवाई का करू नये, याचा खुलासा करावा आणि घटनेचा सविस्तर अहवाल तीन दिवसांत द्यावा, असा आदेश शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी दिला आहे.

चौकशीचे आदेश

डिचोलीचे पोलिस निरीक्षक राहुल नाईक यांनी शाळेच्या पातळीवर या घटनेचा तपास करून कारवाई करावी आणि शाळेत पुरेसे सीसीटीव्ही बसवावेत, असे शाळा व्यवस्थापनाला बजावले आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही शिक्षण खाते आणि पोलिसांना या प्रकरणाची कसून चौकशी करावी, असा आदेश दिला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिस बारकाईने तपास करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sunburn Festival 2024: धार्मिक स्थळी 'असले' कार्यक्रम नकोच! 'सनबर्न' साठीच्या सभेनंतर ग्रामस्थ ठरवणार दिशा

Israel-Iran War: इस्रायल-इराण युद्धानं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार! भारतासह जगभरातील देशांना बसणार फटका

वेलिंगकरप्रकरणी 'लुकआऊट नोटीस' जारी! हिंदुत्ववादी संघटनांचे समर्थन; पोलिसांची पथके मागावर

'पोल्ट्री उद्योगाला' सरकारकडून पूर्ण सहकार्य देणार! युवकांनी उद्योग-व्यवसायात यावे असे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Rashi Bhavishya 6 October 2024: कष्टातून मिळणार समृद्धी,पार्टनरशिपमधून होणार सुखाची प्राप्ती; जाणून घ्या कसा असेल तुमचा दिवस

SCROLL FOR NEXT