CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Pramod Sawant: नद्या प्रदूषणमुक्त ठेवा

Pramod Sawant: साखळीत त्रिपुरारी पौर्णिमा उत्साहात

गोमन्तक डिजिटल टीम

Pramod Sawant: पर्यटन व्यवसाय पुढे नेण्यासाठी स्वच्छता महत्वाची असून, वाळवंटीसह राज्यातील सर्व नद्या स्वच्छ आणि प्रदूषण विरहीत ठेवण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

विठ्ठलापूर-साखळी येथील 'त्रिपुरारी पौर्णिमा' उत्सवानिमित्त आयोजित सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. ते पुढे म्हणाले, भविष्यात गोव्यात सांस्कृतिक पर्यटनाला मोठा वाव असून, कला, उत्सवांच्या माध्यमातून पर्यटन उद्योग वृद्धिंगत होण्यास मदत होणार आहे. त्यासाठी प्रत्येकाच्या सहभागाची गरज आहे.

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त वाळवंटी नदीकाठी पार पडलेल्या या सोहळ्यास पर्यटन मंत्री रोहन खवंटे, कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, कारापूर-सर्वणचे सरपंच दत्तप्रसाद खारकांडे, दीपावली उत्सव समितीचे अध्यक्ष शैलेश फातर्पेकर, पर्यटन

खात्याचे संचालक नारायण सावंत, कला आणि संस्कृती खात्याचे संचालक सगुण वेळीप, साखळी पालिकेचे मुख्याधिकारी कबीर शिरगावकर, अन्य सरकारी अधिकारी विठ्ठल देवस्थानचे पदाधिकारी, नगरसेवक आदी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्री, आमदार तसेच अन्य मान्यवरांनी ‘नौकाविहार’ स्पर्धेचा आस्वाद घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT