Goa Mining | Workers Dainik Gomantak
गोवा

Goa Mining: आम्हाला डावलून खाणी सुरु करु नका!

Goa Mining: सरकारच्या योजनेनुसार पहिल्या टप्प्यात डिचोलीतील खाण ब्लॉकचा लिलाव अपेक्षित आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Mining: डिचोलीतील खाण ब्लॉकचा लिलाव झाल्यानंतर सेझाच्या सध्याच्या कामगारांना डावलून खाण सुरू करण्याचा प्रयत्न झाल्यास, तो हाणून पाडण्यात येईल. वेळप्रसंगी कामगार तीव्र आंदोलन छेडणार, असे स्पष्ट संकेत सेझा कामगारांच्यावतीने कायदा सल्लागार ॲड. अजय प्रभुगावकर यांनी दिले आहेत.

खाणलीजधारकांची आव्हान याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्याने आता खाण ब्लॉकच्या लिलावाचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारच्या योजनेनुसार पहिल्या टप्प्यात डिचोलीतील खाण ब्लॉकचा लिलाव अपेक्षित आहे. लिलावातून डिचोलीतील खाणीचा ताबा कोणत्याही कंपनीने घेतला, तरी सध्याच्या कामगारांना कामावर घ्यावेच लागणार.

दरम्यान, तसा प्रस्तावही कामगारांच्यावतीने मुख्यमंत्र्यांना दिला आहे, असेही ॲड. प्रभूगावकर यांनी सांगितले आहे. सेझाच्या सध्याच्या 300 हून अधिक कामगारांना काम मिळाले नाही, तर कामगार स्वस्थ बसणार नाही. गेल्या मंगळवारी त्या याचिकेवर निर्णय देताना न्यायलयाने 'रिट्रेचमेंट' नोटीसीला तात्पुरती स्थगिती दिली आहे.

संघटनेच्या फेर याचिकेवर मंगळवारी सुनावणी

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘एम्प्लॉयीज युनियन ऑफ सेसा मायनिंग वर्कर्स’ संघटनेच्या फेरयाचिकेवर आता केंद्रीय कामगार सचिवांसमोर येत्या 11 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. यावेळी आपल्याला न्याय मिळेले, अशी अपेक्षा कामगारांची आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Smartphones Under 20000: 20 हजारांच्या आत धांसू 5G फोन! मोठी बॅटरी, AMOLED डिस्प्ले आणि जबरदस्त कॅमेरा; पाहा 5 बेस्ट पर्याय

नियम पाळा नाहीतर गाशा गुंडाळा! मुलांच्या ऑनलाईन सुरक्षेवर सरकारचा मास्टरस्ट्रोक; इंस्टाग्राम अन् फेसबुकवर करडी नजर

DA Hike 2026: ऑक्टोबर महिन्यात धमाका! नवरात्र-दिवाळीआधी 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकार देणार मोठं गिफ्ट; महागाई भत्त्यात 4 टक्के वाढीचा जॅकपॉट

Houthi Missile Attack Saudi Arabia: मध्य पूर्वेत महायुद्धाचा भडका! हूतींच्या ड्रोन-मिसाईल हल्ल्याने पुन्हा हादरला सौदी अरेबिया; 3 शहरांमध्ये इमर्जन्सी जाहीर

UPI Payment New Rule: यूपीआय वापरणाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर! 2000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर 1 रुपयाही चार्ज लागणार नाही; गॅझेट नोटिफिकेशन जारी

SCROLL FOR NEXT