Public Hearing Location Dainik Gomantak
गोवा

Vedanta Bicholim Mines: डिचोली खाण ब्लॉक प्रकरणी सरकार भूमिकेवर ठाम, जनतेत रोष; जनसुनावणी तापणार?

डिचोलीत आज ‘वेदांता’तर्फे आयोजन : प्रक्रिया रद्द करा : गोवा फाऊंडेशनचे निवेदन; प्रकरण तापण्याची शक्यता, प्रशासन सज्ज

गोमन्तक डिजिटल टीम

Vedanta Bicholim Mines विधानसभा आणि विधानसभेबाहेरही डिचोली खाणपट्ट्यातील खाणींना पर्यावरण दाखला देण्यासाठीच्या जनसुनावणीबाबत अपुरी माहिती दिल्याने तसेच खाणकामाला हरित प्रकल्प संबोधल्याने ती जनसुनावणी पुढे ढकलण्याची जोरदार मागणी होत असतानाच सरकार मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहे.

त्यामुळे जनतेत रोष वाढला असून त्याचे पडसाद शुक्रवारी वाठादेव येथील झांटये महाविद्यालयाच्या क्रीडा संकुलात होणाऱ्या जनसुनावणीवेळी उमटणार आहेत.

गोवा फाऊंडेशनने या जनसुनावणीसाठी तयार केलेला पर्यावरण आघात मूल्यांकन अहवाल हा दिशाभूल करणारा असल्याने जनसुनावणी रद्द करावी, असे निवेदन सादर केले आहे.- ...तोपर्यंत दाखले नकोच!

पुढील 50 वर्षांचा विचार करून पुनर्वसन आराखडा तयार करा. तोपर्यंत पर्यावरणीय दाखला देऊ नये, अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेच्या मये युनिटने केली आहे.

तर खाण लीजमधून घरेदारे, शेती-बागायती, नैसर्गिक जलस्रोत आणि धार्मिक स्थळे वगळा, अशी मागणी मुळगावच्या जनतेने केली आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालावर अभ्यास करण्यासाठी वेळ हवा, यासाठी जनसुनावणी पुढे ढकलावी, अशी मागणी मये व मुळगावच्या जनतेने केली आहे.

सुनावणी पुढे ढकलण्याचेही संकेत

डिचोली खाण ब्लॉकअंतर्गत वेदांताच्या खाणीला आवश्यक असलेल्या पर्यावरणीय दाखल्यासाठी (ईसी) उद्या डिचोलीत जनसुनावणी होणार आहे. वाठादेव येथील झांट्ये महाविद्यालयाच्या क्रीडा संकुलात ही जनसुनावणी होणार आहे.

कमी केलेल्या सेझा कामगारांची आक्रमकता, पंचायती आणि शेतकऱ्यांनी पुढे केलेले मुद्दे आणि गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहता उद्याची जनसुनावणी तापण्याची शक्यता आहे. जनसुनावणी पुढे ढकलण्याची मागणीही पुढे येऊ शकते.

अशी आहे पार्श्वभूमी...

  • डिचोली खाण ब्लॉक वेदांता कंपनीने मिळवला असून, याअंतर्गत व्यवसायाच्या हालचाली सुरू आहेत.

  • खाण व्यवसायांतर्गत ४१८ हेक्टर जमीन आहे.

  • गेल्या दीड महिन्यापासून शिरगाव, मुळगाव, मये, पिळगाव पंचायत क्षेत्रासह डिचोली पालिका क्षेत्रातील लामगाव, बोर्डे आदी भागांत खाणविरोधी वातावरण.

  • खाण व्यवसायास कोणाचाच विरोध नाही.

  • मात्र, स्थानिक कामगार व गावाच्या हिताचा विचार झाला नाही तर व्यवसाय नको, अशी भूमिका प्रकल्पग्रस्तांनी घेतली आहे.

  • या मुद्यावरून ग्रामसभाही तापल्या आहेत.

  • शेतकरी, कोमुनिदाद, देवस्थान समित्यांनीही आपले मुद्दे पुढे केले आहेत.

वस्तीचा भाग खाणक्षेत्रात

स्थानिक पातळीवर खाण हद्द ठरवताना वस्तीचा भाग आणि मंदिरे खाण क्षेत्रात दाखवल्याने मुळगाव, लामगाव परिसरातील लोक आक्रमक झाले आहेत. असे होत असेल तर गावात खाणकामच नको, अशी टोकाची भूमिका घेण्याचे लोकांनी ठरवले आहे.

डिचोली खाणपट्ट्यातील लिलाव केलेल्या खाणक्षेत्रात अनेक शेतजमिनी, लोकांची घरे तसेच मंदिरेही मोठ्या संख्येने आहेत. यासाठी सरकारने शुक्रवारी जनसुनावणी जाहीर केली आहे.

मात्र, येथील स्थानिक रहिवाशांचे तसेच खाण कामगारांचे प्रश्‍न सोडवल्याशिवाय सरकारने घाईगडबडीने जनसुनावणी घेऊ नये. लोकांचे प्रश्‍न सोडवल्यानंतरच जनसुनावणी घ्यावी.

- युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT