Bicholim Market Dainik Gomantak
गोवा

Ganesh Chaturthi: व्यावसायिकांना ‘अच्छे दिन’: फुलांना तेजी, भावही वाढला

सणासुदीत व्यावसायिकांना ‘अच्छे दिन’: दोन दिवसांत पाच टन फुलांची विक्री

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim Market चतुर्थीनिमित्त डिचोलीत फुलांचा बाजार फुलला असून, फुलांना प्रचंड मागणी असल्याचे चित्र दिसून येत आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून डिचोली बाजारात फुलांना प्रचंड मागणी असून, पुढील किमान दोन ते तीन दिवस तरी फुलांना मागणी कायम राहणार आहे.

मागणी असल्याने फुलांचा भावही वाढला आहे. मात्र, पुढील दोन दिवसांत फुलांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असून, फुले महागण्याची शक्यता आहे.

गणपती बाप्पांच्या घरोघरी आगमनाच्या पूर्वदिनी आणि काल (मंगळवारी) मिळून दोन दिवसांत बाजारात जवळपास पाच टनहून अधिक फुलांची विक्री झाल्याचा अंदाज आहे. आजही (बुधवारी) फुले खरेदीला प्रचंड जोर आला होता.

गणपती बाप्पाच्या नावाने फुलांना मागणी असल्याने फूल बाजारातील वातावरणही खुलून उठले असून, फुले विक्रेत्यांना ''अच्छे दिन'' आले आहेत. डिचोलीत कर्नाटक राज्यातून झेंडू, डिस्को, सफेद मिळून विविध प्रकारची शेवंती, लहान गुलाब, अस्टर यांंची आवक होते.

झेंडूची फुलेही महागली

गेल्या चार दिवसांपासून बाजारात फुलांची प्रचंड आवक होत आहे. स्थानिक जाईची फुलेही बाजारात उपलब्ध होत असली, तरी त्यांचे प्रमाण कमी आहे. फुलांना मागणी वाढल्याने फुलांचे दरही वाढले आहेत.

सध्या झेंडू फ़ुलांचे दर 160 रुपये किलो असे आहेत. तर सफेद शेवंती, लांब देठाची आणि डिस्को शेवंती, अस्टर आणि लहान गुलाब 300 ते 320 रुपये किलो याप्रमाणे विकण्यात येत आहेत. फुलांच्या हारांनाही प्रचंड मागणी आहे. आकाराप्रमाणे 100 रुपयांपासून 400 रुपयांपर्यंत पुष्पहार विकण्यात येत आहेत.

आंबाडे गायब

चतुर्थीत आंबाड्यांना मोठी मागणी असते. यंदा मात्र आंबाड्यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. आज (बुधवारी) तर बाजारात ''आंबाडे'' क्वचितच दिसून येत होते.

5 रूपये एक नग याप्रमाणे आंबाड्यांना भाव आला आहे. पावसामुळे आंबाडे काढण्यात अडचण निर्माण झाल्याने यंदा चतुर्थीत आंबाड्यांचा तुटवडा निर्माण झाल्याचे एका विक्रेत्याने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Seized: हणजूण पोलिसांची मोठी कारवाई! 'मॅजिक मशरुम'सह फ्रेंच महिलेला गोव्यात अटक; 25 लाखांचा अंमली पदार्थ जप्त

'विवाहित पुरुषाचं 'लिव-इन रिलेशनशिप' हा गुन्हा नाही'! हायकोर्टाचा मोठा निर्णय; नेमकं प्रकरण काय?

Excise Duty on Petrol and Diesel: केंद्र सरकारचा मोठा निर्णय! पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात मोठी कपात

व्हॉट्सॲप कॉल अन् CBI ची धमकी! 90.85 लाख उकळणारा केरळचा 21 वर्षीय भामटा जेरबंद; गोवा पोलिसांकडून 'डिजिटल अरेस्ट'चा पर्दाफाश

Crime News: तिचे केस तुला आवडतात ना? मग घे! प्रियकराच्या 'त्या' एका वाक्यानं प्रेयसीचं डोकं सरकलं अन् रागात तिनं...

SCROLL FOR NEXT