LPG Gas Shortage Dainik Gomantak
गोवा

LPG Gas Shortage: डिचोलीत हॉटेलवाल्यांची 'चुली'वर भिस्त, सिलिंडरचा तुटवडा कायम; सरपणाला वाढता भाव; 'मेनू'वरही मर्यादा

Goa LPG Gas Shortage: व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेली समस्या अजूनही कायम असून, डिचोलीत तर हॉटेल व्यावसायिक अडचणीत आले आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेली समस्या अजूनही कायम असून, डिचोलीत तर हॉटेल व्यावसायिक अडचणीत आले आहेत. सिलिंडरच्या तुटवड्यामुळे काही हॉटेल्स बंद ठेवावी लागत आहेत.

तर काही हॉटेलमधील किचनमध्ये आता चुली पेटू लागल्या आहेत. शहरातील काही हॉटेलमध्ये चुली पेटत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

चुली पेटविण्याची पाळी आल्याने सरपणांनाही (लाकडे) भाव आला आहे. ही परिस्थिती अशीच राहिली, तर कालांतराने हॉटेलमधून गॅस सिलिंडर गायब होऊन प्रत्येक हॉटेलमधून पूर्वीप्रमाणे ‘चुलीवरचे जेवण’ असा मेनूकार्ड बनवावा लागण्याची पाळी येते की काय? असा प्रश्न हॉटेलचालकांना पडला आहे.

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे गेल्या जवळपास २२ दिवसांपासून हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील दैनंदिन मेनूवर मर्यादा आल्या आहेत. भाजीचे काही प्रकार करण्याचे हॉटेल चालकांनी टाळले आहे.

काही हॉटेल चालकांनी चहावरही मर्यादा आणल्या आहेत. सध्या तर काही हॉटेलमधून ‘स्पेशल चहा’वर मर्यादा आली आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या अनुपलब्धतेमुळे काही हॉटेलवाले भाजी आदी खाद्यपदार्थ घरी शिजवून हॉटेलमध्ये उपलब्ध करतात.

दैनंदिन मेनूवर मर्यादा आल्याने हॉटेलवाल्यांची कमाईही घटली आहे. शहरातील काही हॉटेलही अधूनमधून बंद ठेवावी लागत आहेत. मी चालवत असलेले हॉटेल आठ दिवसांपासून बंद आहे, असे एक महिला व्यावसायिक संगीता मळीक यांनी सांगितले.

सरपण मिळणेही कठीण; तरी पेटवली चूल!

हॉटेल बंद ठेवले तर दैनंदिन आर्थिक कमाई बंद होत असून, नुकसानी सोसावी लागत आहे. हॉटेल बंद ठेवले, तरी मिठाई कामगार आणि वेटरनाही पगार द्यावा लागतो. त्यामुळे आर्थिक ताण वाढत आहे. दुसऱ्याबाजूने हॉटेल बंद ठेवले, तर ग्राहकांची गैरसोय होते. नियमित ग्राहक तुटण्याची भीती अधिक आहे. त्यामुळे पर्याय म्हणून चूल पेटवावी लागत आहे.

सध्याच्या काळात हॉटेलमध्ये चुलीचा प्रयोग नवीन वाटत असला, तरी सध्या तरी त्याच्याशिवाय पर्याय नाही. सध्या सरपण (लाकडे) मिळणेही कठीण होत आहे. त्यामुळे हा प्रयोग कायम चालू ठेवणे परवडणार नाही, असे एकनाथ लामगावकर आणि अन्य काही हॉटेल चालकांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan: बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सुरक्षा दलांची मोठी कारवाई; 35 दहशतवाद्यांचा खात्मा, 3 वरिष्ठ कमांडर अटकेत

Goa School: आगरवाडा हायस्कूल इमारतीची आरोलकरांकडून पाहणी; कामातील त्रुटींवर व्यक्त केली नाराजी

Mulgao mining: मुळगावात खाणविरोधातील लढा संघटितपणे तीव्र करण्याचा निर्धार; जाहीर सभेत गावकऱ्यांची वज्रमूठ!

Mexico Shooting: मेक्सिकोमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांचा अंदाधुंद गोळीबार, लहान मुलासह 10 जणांचा जागीच मृत्यू; शेकडो लोकांनी सोडली घरे

Dudhsagar Jeep Election: जीप असोसिएशनच्या निवडणुकीत नीलेश वेळीप यांचा डंका, दिलीप मायरेकर आणि मयूर मराठेही विजयी; नव्या नेतृत्वाला कौल!

SCROLL FOR NEXT