विधेयकाबाबत गोमंतकीय भुमिपुत्रांच्‍या प्रतिक्रिया Dainik Gomantak
गोवा

Bhumiputra विधेयकाबाबत गोमंतकीय भुमिपुत्रांच्‍या प्रतिक्रिया

राज्य सरकारने आणल्‍यामुळे भूमिपुत्र अधिकारिणी विधेयकामुळे गोमंतकीय संतप्‍त बनले आहेत.

दैनिक गोमन्तक

फोंडा : राज्य सरकारने (Goa Government) आणल्‍यामुळे भूमिपुत्र (Bhumiputra Bill) अधिकारिणी विधेयकामुळे गोमंतकीय संतप्‍त बनले आहेत. लोकांच्या रोषानंतर आता मुख्यमंत्र्यांनी (CM Pramod Sawant) या विधेयकाचे नाव बदलले असले तरी गोमंतकीयांच्या हिताआड येणाऱ्या अशा प्रकारच्या विधेयकांना थारा मिळता कामा नये. गोवा हा गोमंतकीयांचा आहे आणि गोव्याचे हीत जपणे हे सरकारचे कर्तव्य आहे. (Goa Bhumiputra's reaction to Bhumiputra Adhikari Bill)

भूमिपुत्र अधिकारिणी विधेयक आणून गोमंतकीयांत फूट पाडण्‍याचा डाव असल्‍याचा आरोप काहींनी केला आहे. तर, काहींनी सदर विधेयक चांगले असले तरी मूळ गोमंतकीयांच्या हिताला बाधा पोचता कामा नये, गोमंतकीयांनी प्रतिकूल परिस्थितीत पोर्तुगीज जुलमी राजवटीतही गोव्याचे अस्तित्व टिकवून ठेवले आहे, ते अबाधित ठेवणे हे सरकारचे काम असल्याचे मत व्यक्त केले आहे.

कूळ-मुंडकारांचे काय झाले?

राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांनी कूळ-मुंडकार कायद्यासाठी मोठे परिश्रम घेतले. मात्र अजून कूळ-मुंडकारांची प्रकरणे शिल्लक आहेत. ही प्रकरणे आधी निकाली काढण्याची आवश्‍यकता आहे. कुळांना न्याय देण्यासाठी सरकारने प्रत्येक तालुक्यात खास मामलेदाराची नियुक्ती करणे आवश्‍यक असून जलद न्यायालयाद्वारे ही प्रकरणे निकाली काढणे शक्य होईल, अशाही प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

आदिवासी लोकांनी गोव्याच्या हितासाठी जे काम केले आहे त्याला तोड नाही. त्यामुळे गोव्याचे हित जपतानाच आदिवासी आणि इतर गोमंतकीय समाजबांधवांचेही हीत जपण्याची आवश्‍यकता आहे. युनायटेड ट्रायबल्स असोसिएशनच्या माध्यमातून गोव्यासाठी भरीव काम केले जात आहे, त्यामुळे भूमिपुत्र विधेयकात दुरुस्त्या करणे आवश्‍‍यक आहे.

- विश्‍वास गावडे (अध्यक्ष, गौड मराठा समाज)

गोव्याचे हित हे गोमंतकीयांनीच जपले आहे. त्यामुळे भूमिपुत्रासारखे विधेयक आणून गोमंतकीयांत संभ्रम निर्माण करणे बरोबर नाही. अनुसूचित जमातीच्या आदिवासी लोकांनी गोव्याचे अस्तित्व राखून ठेवले आहे. इतर समाजातील लोकांचेही गोव्याच्या हितात योगदान आहे. मात्र अशा प्रकारचे विधेयक आणून संभ्रम निर्माण करणे ठीक नाही.

- कांता गावडे (ज्येष्ठ लोककला कलाकार, प्रियोळ)

सरकारने भूमिपुत्र अधिकारिणी विधेयक आणले ते बरे केले. फक्त त्यात काही त्रुटी आहेत, त्या दूर व्हायला हव्यात. गोमंतकीयांची अस्मिता ही टिकून राहिलीच पाहिजे. आता मुख्यमंत्र्यांनी त्यात दुरुस्ती करणार असल्याचे जाहीर केल्याने या निर्णयाचे स्वागतच आहे.

- विनोद पोकळे (सामाजिक कार्यकर्ता, मडकई)

गोमंतकीयांनी प्रतिकूल परिस्थितीत गोवा सांभाळला आहे. पोर्तुगिजांची राजवट उलथून टाकण्यासाठी प्रसंगी बलिदान दिले आहे, मात्र गोव्याची अस्मिता आणि एकता दुभंगू दिली नाही. भूमिपुत्र म्हणून गोमंतकीयांना सार्थ अभिमान आहे. त्यामुळेच सरकारने सारासार विचार करायला हवा. याआधी कूळ-मुंडकारांचे प्रश्‍न प्रलंबित आहेत, तेही सोडवा.

- हनुमंत नाईक (सामाजिक कार्यकर्ता, दुर्भाट)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT