Bhoma Village Dainik Gomantak
गोवा

Bhoma Village: भाजपने गोमंतकीयांच्या घरावर वरवंटा फिरवण्याचा विडाच उचललाय, रस्त्याचे प्रयोजन न थांबवल्यास....

अन्यथा लोकसभा निवडणुकीत धडाः भोम ग्रामस्थ आक्रमक

गोमन्तक डिजिटल टीम

Bhoma Village भोम गावातून रस्ता नेण्याचे प्रयोजन येत्या 15 दिवसांत रद्द करा. अन्यथा भोमवासीय रस्त्यावर उतरतील, असा इशारा देतानाच गेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार श्रीपाद नाईक यांना मते दिली होती. मात्र, यावेळी प्रखर विरोध केला जाईल, असा निर्धार भोमवासीयांनी आज (रविवारी) झालेल्या सभेत केला.

भोम येथील सातेरी मंदिरासमोरील पटांगणात झालेल्या या सभेला ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’चे आमदार वीरेश बोरकर, कांता गावडे, शंकर पोळजी, राजदीप नाईक, रामा काणकोणकर, झरिना डिकुन्हा, सुनील जल्मी तसेच इतर समाज कार्यकर्ते उपस्थित होते.

बोरकर म्हणाले की, राज्यातील भाजप सरकारने गोमंतकीयांच्या घरा-दारावर वरवंटा फिरवण्याचा विडाच उचलला असून बिगर गोमंतकीयांना खुले रान सोडले आहे. हे थांबविण्याची गरज असून सर्वांनी संघटितपणे लढा उभारावा.

खासदारांकडून लोकांची निराशा

भोमवासीयांच्या भावना कळविण्यासाठी काही ग्रामस्थ केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे गेले असता, आपण सरकारसोबत असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितल्याचे भोमचे आंदोलक संजय नाईक म्हणाले.

वास्तविक श्रीपादभाऊंचा पाठिंबा आम्हाला अपेक्षित होता; पण त्यांनी निराशा केल्याने आता भोमवासीय श्रीपाद भाऊंसमवेत राहणार नसल्याचे नाईक यांनी सांगितले.

सभेला महिलांची लक्षणीय उपस्थिती

भोमच्या रस्ता आंदोलनात प्रत्येक सभेला महिलांची उपस्थिती लक्षणीय असते. आजच्या सभेलाही महिलांची मोठी उपस्थिती दिसली. आम्हाला गावाबाहेरून बगल मार्ग हवा आणि सरकारने तो न दिल्यास प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा इशारा या महिलांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT