Goa Bench Dainik Gomantak
गोवा

Goa Bench: उच्च न्यायालय कर्मचाऱ्यांना गोवा खंडपीठाकडून दिलासा

Goa Bench Of Bombay High Court: २००७ ते २०२४ पर्यंतची सुमारे सरासरी ६.५८ रु. थकबाकी एका वर्षात देण्याचे निर्देश

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोव्यातील उच्च न्यायालयामधील कर्मचाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या इतर खंडपीठाप्रमाणेच समान वेतन लागू करण्याचा निवाडा गोवा खंडपीठाने आज दिला. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सुधारित वेतनश्रेणी निश्‍चित करण्याबरोबरच २००७ ते २०२४ पर्यंतची सुमारे सरासरी ६.५८ रु. थकबाकी एका वर्षात देण्याचे निर्देश दिले आहेत.

उच्च न्यायालयातील वरिष्ठ खासगी सचिव संतोष म्हामल व इतर ७ जण तसेच विभाग अधिकारी हिपोलिटो आझेवेदो व इतर १२ जणांनी दोन वेगवेगळ्या याचिका गेल्यावर्षी सादर केल्या होत्या. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद, नागपूर व मुंबई येथील कर्मचाऱ्यांना समान वेतनश्रेणी आहे.

मात्र, उच्च न्यायालयाच्या गोव्यातील कर्मचाऱ्यांना ती वेतनश्रेणी गोवा सरकारने लागू केली नाही. ही समान वेतनश्रेणी गोव्यातही लागू करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती केली होती.

सरकारतर्फे एजी देविदास पांगम यांनी तर याचिकादारांतर्फे ॲड. दत्तप्रसाद लवंदे, ॲड. डी. डी. झवेरी, ॲड. नेहा शिरोडकर यांनी बाजू मांडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao: रेल्वे स्थानकावर महिलांना लुबाडणारा चोरटा जेरबंद, 1 लाख 60 हजाराची सोनसाखळी हस्तगत

Belgaum Goa Highway: अर्धवट हत्ती ब्रिजचं काम सुरु होणार; बेळगाव-गोवा महामार्गावरील 'हा' रास्ता मार्ग दीड महिना बंद

Anant Chaturdashi: "नव्या सुरुवातींचा, श्रद्धेचा आणि आशेचा दिवस" अनंत चतुर्दशीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

Goa: जीप समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाणं पर्यटकास पडलं महागात, पोलिसांनी ठोठावला दंड

Goa Politics: खरी कुजबुज; विजय मुख्यमंत्री झाले तर...

SCROLL FOR NEXT