Court Order Dainik Gomantak
गोवा

Siolim Oshel: 'ओशेल झऱ्या'च्या परिसरातील बांधकाम पुढील सुनावणीपर्यंत बंद; प्रकल्प मालकाची तोंडी हमी

Goa Bench: शिवोली येथील ओशेल झऱ्याच्या परिसरात सुरू असलेले बहुनिवासी प्रकल्पाचे बांधकाम पुढील सुनावणीपर्यंत बंद ठेवले जाईल अशी तोंडी हमी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला प्रकल्पाच्या मालकांनी (बिल्डर्स) दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

Builders Agree to Pause Construction Near Shivoli's Oshal Spring

पणजी: शिवोली येथील ओशेल झऱ्याच्या परिसरात सुरू असलेले बहुनिवासी प्रकल्पाचे बांधकाम पुढील सुनावणीपर्यंत बंद ठेवले जाईल अशी तोंडी हमी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला प्रकल्पाच्या मालकांनी (बिल्डर्स) दिली. झरा असलेल्या परिसरातील तपासणी करून त्यावर या बांधकामुळे होणारा परिणाम याचा अहवाल तसेच नगर नियोजन खात्याने बांधकामाला दिलेला परवान्यासंदर्भातचा वैज्ञानिक अहवाल १३ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश गोवा खंडपीठाने दिले. जनहित याचिकेवरील सुनावणी १४ नोव्हेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

ओशेल झरा परिसरात सुरू असलेल्या बांधकामाच्या सांडपाणी निचऱ्याच्या टाक्यांमुळे होणारे दूषित व अपरिवर्तनीय हानीबाबत ओशेलवासीयांतर्फे सूरज चोडणकर व आवेर्तान मिरांडा यांनी गोवा खंडपीठात जनहित सादर केली आहे. ओशेल गावातील सर्वे क्रमांक ५१/२१ मध्ये सध्या आठ बंगले व जलतरणाचे काम सुरू आहे. या आठ बंगल्‍यांपैकी चार पूर्ण झाले असून उर्वरित चारचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम सुरू राहिल्यास त्याचा झऱ्याच्या परिसरावर परिणाम होणार असल्याने अंतरिम आदेशाद्वारे या बांधकामाला स्थगिती देण्याची विनंती याचिकादाराचे वकील ओम डिकॉस्ता यांनी केली.

...तर झऱ्यावर परिणाम

मे. रारा एक्स्पोर्टस् प्रा. लि., विन्ती साहनी, मे. जय संतोषी हाउसिंग प्रा. लि. ने ओशेल गावातील सर्वे क्रमांक ५१/२१ मध्ये सध्या आठ बंगले व जलतरण तलावाचे काम सुरू केले आहे. या भागात जवळच ओशेल झरा आहे. त्यामुळे तेथील बहुनिवासी प्रकल्पामुळे तेथील सांडपाणी निचरा होऊन ते या झऱ्यात पोहचू शकते व हा झरा सुमारे ३५० वर्षापूर्वीचा आहे. या झऱ्याचे पाणी स्थानिक पिण्यासाठी वापरतात. या झऱ्याचा जलस्रोत खात्याने तयार केलेल्या जलसाठा यादीत समावेश आहे. हा प्रकल्प झऱ्यापासून सुमारे ३३ मीटर अंतरावर आहे. या बांधकामाच्या ठिकाणी बोअरवेल खोदल्यास त्याचा परिणाम झऱ्यावर होईल,असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

बफर क्षेत्र अधिसूचित नाही!

बंगल्यांच्या मालकांतर्फे वकिलांनी बाजू मांडताना सांगितले की, या परिसरात आणखीही काही बांधकामे उभारण्यात आलेली आहेत. हा ‘बफर’ क्षेत्र असल्याचे राज्य किंवा केंद्र सरकारने अधिसूचित केलेला नाही. हे बांधकाम तेथे असलेल्या ओशेल झऱ्यापासून दूरवर आहे व त्याचा कोणताच परिणाम होण्याची शक्यता नाही. नगर नियोजन खात्याने या बांधकामाला परवानगी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Navy Goa: गोव्यात नौदलाच्या जहाजाचा अपघात; मच्छिमारांच्या बोटीला धडक, दोन बेपत्ता, 11 जाणांना वाचविण्यात यश

Saint Francis Xavier Exposition: जुन्या गोवेत देशी-विदेशी भाविकांची गर्दी! कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांनी प्रार्थना घेऊन केला शुभारंभ

Electricity Tariff Hike: वीज दरवाढीच्या शिफारशींना ‘जीसीसीआय’चा आक्षेप; पर्यटन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होण्याची शंका

Panaji: मांडवी पुलावर पेटत्या कारचा थरार! आगीच्या भडक्यात दर्शनी भाग जळून खाक; शॉर्टसर्किट झाल्याचा संशय

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

SCROLL FOR NEXT