Goa Forest  Dainik Gomantak
गोवा

Goa Forest: आसगाव वन क्षेत्रातील झाडे कापण्यास खंडपीठाची स्थगिती

Goa Forest: आसगाव येथील खासगी वनक्षेत्रातील 48 झाडे कापण्यास वृक्ष अधिकाकारिणीने दिलेल्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने स्थगिती दिली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Forest: आसगाव येथील खासगी वनक्षेत्रातील 48 झाडे कापण्यास वृक्ष अधिकाकारिणीने दिलेल्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने स्थगिती दिली आहे. याप्रकरणी न्यायालयाने प्रतिवाद्यांना नोटीस बजावून त्यावरील सुनावणी 4 जानेवारी 2014 पर्यंत तहकूब केली आहे.

आवेर्तिनो मिरांडा याने या झाडे कापण्याच्या आदेशाविरुद्ध खंडपीठात याचिका सादर केली आहे. या याचिकेत त्याने राज्य सरकारसह वृक्ष अधिकारिणी, उप वनसंरक्षक, फाबियोला मेंडिस रॉड्रिग्ज, वन संवर्धन प्राधिकरण यांना प्रतिवादी केले आहे. प्राथमिक सुनावणीनंतर या सर्वांना न्यायालयाने नोटीस बजावून बाजू मांडण्यास सांगितले आहे.

आसगाव येथील सर्वे क्रमांक 128/8 मध्ये असलेली 48 झाडे कापण्यासाठी फाबियोला मेंडिस रॉड्रिग्ज यांनी वृक्ष अधिकारिणीकडे अर्ज केला असता तिला परवानगी देण्यात आली होती. याचिकादाराने या परवानगीला आक्षेप घेऊन संबंधित प्राधिकरणाकडे आव्हान दिले होते.

या प्राधिकरणाने प्रथम त्याला स्थगिती दिली होती. सुनावणीनंतर ही स्थगिती उठवून वृक्ष अधिकारिणीने दिलेला आदेश कायम केला होता. या आदेशाला आव्हान देण्यात आले आहे.

वृक्ष अधिकारिणीने झाडे कापण्यासाठी परवानगी देण्यापूर्वी झाडे कशासाठी कापण्यात येत आहेत, किती झाडे कापण्यात येणार आहेत. कोणत्या प्रकारची ही झाडे आहेत ही सर्व माहिती कायद्यानुसार घेणे आवश्‍यक होती मात्र ती न घेताच ही परवानगी देण्यात आल्याचा मुद्दा याचिकादारने उपस्थित केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT