ताळगाव येथील सर्वे क्रमांक 276/6 मध्ये बेकायदा डोंगर कापून बांधकामासाठी वापरण्यात आलेला भाग पूर्ववत करण्याचा तसेच 25 लाखांची रक्कम न्यायालयामध्ये जमा करण्याचे निर्देश देऊनही एस्टोनिओ आल्मेदा यांनी त्याची पूर्तता न केल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आज त्यांची कानउघाडणी केली.
(Goa Illegal Construction)
त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामधील माहितीबाबत असमाधान व्यक्त करत त्यांची मालमत्ता जप्त केली जाईल, अशी ताकीद दिली.
खंडपीठाने त्यांना येत्या 17 ऑगस्टपर्यंत 10 लाख जमा करण्याचे तसेच उत्तर गोवा नियोजन व विकास प्राधिकरणाला (एनजीपीडीए) कापलेला डोंगर पूर्ववत करण्याच्या कामावर देखरेख ठेवण्याचे निर्देश दिले.
गोवा खंडपीठाने दिलेल्या मागील सुनावणीवेळी दिलेल्या निर्देशानुसार एस्टोनिओ आल्मेदा याने 25 लाख रुपये भरणे शक्य नसल्याचे कारण सादर केले.
गोवा खंडपीठाने त्यांचे हे कारण ऐकून न घेता अवमान नोटीस देण्यात येईल अशी तंबी दिली. कोणत्याही परिस्थितीत ही रक्कम जमा करा अन्यथा त्याचे परिणाम वाईट होतील, असेही सुनावले.
ही सुरक्षा ठेव रक्कम त्यांनी त्यांच्या मालमत्तेतून आजच जमा करण्याची सूचना केली. किती मालमत्ता आहे, याचा तपशील दुपारनंतर प्रतिज्ञापत्रे सादर करण्याचे तोंडी निर्देश दिले व ही सुनावणी आज संध्याकाळी 4.30 पूर्वी ठेवली.
त्यानुसार न्यायालयात उपस्थित असलेल्या एस्टोनिओ आल्मेदा याने प्रतिज्ञापत्र सादर करत दिलेल्या माहितीने गोवा खंडपीठही अचंबित झाले.
त्यांना कोलवाळ तुरुंगातच पाठवतो, असे खंडपीठाने सुनावले. तेथील कापलेल्या डोंगराळचा भाग पूर्वस्थितीत करण्याचे काम सुरू आहे, त्यावर एनजीपीडीने लक्ष ठेवावे, असे निर्देश दिले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.