Goa Bench Dainik Gomantak
गोवा

Goa Bench: मेरशीत खाजन जमिनीत भराव टाकल्याप्रकरणी खंडपीठाने बजावली नोटीस

गोमन्तक डिजिटल टीम

मेरशी येथील कोमुनिदादच्या खाजन जमिनीतील खारफुटी नष्ट करून ही जागा तेथे मातीचा भराव टाकून बुजवण्यात येत असल्याच्या जनहित याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दखल घेतली आहे.

याप्रकरणी खंडपीठाने ॲड. नायजेल दा कॉस्ता फ्राईस याची ॲमिकस क्युरीची नियुक्ती करून मोरंबी ओ ग्रँडे, मोरंबी ओ पिकेनो, मुरडा कोमुनिदाद व वन खात्याला नोटीस बजावली आहे व पुढील सुनावणी १६ जुलै रोजी ठेवण्यात आली आहे.

मेरशीतील मोरंबी ओ ग्रँडे व मोरंबी ओ पिकनो कोमुनिदादमधील सर्व्हे क्रमांक ३६ व ३७, मेरशी गावातील १२९, १३० व १३१, मुरडा कोमुनिदादमधील सर्व्हे क्रमांक ७६ व ९१ या जमिनीत असलेली खारफुटी नष्ट करण्यात आली आहे व तेथील सखल भाग माती टाकून बुजवण्यात येत आहे.

यासंदर्भात वन खाते, उत्तर गोवा जिल्हाधिकारी, गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण व मेरशी पंचायत यांच्याकडे तक्रार करूनही पर्यावरणाचा विध्वंस करणाऱ्याविरुद्ध कोणतीच कायदेशीर कारवाई केली नाही व कारवाईस चालढकलपणा चालविला आहे, अशी बाजू याचिकादारने मांडली.

याप्रकरणाची दखल घेत खंडपीठाने मोरंबी ओ ग्रँडे व मोरंबी ओ पिकेनो, मुरडा कोमुनिदाद व वन खात्याला याचिकेत प्रतिवादी करण्याचे निर्देश देत त्यांना नोटीस बजावली. यावेळी सरकारी वकिलांतर्फे वन खात्याची नोटीस स्वीकारण्यात आली. यासंदर्भात वन खात्याने तक्रारीवर काय कारवाई केली याची माहिती घेण्यासाठी वेळ द्यावी. यासंदर्भात घेण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल पुढील सुनावणीवेळी सादर केला जाईल, असे सरकारी वकिलांनी सांगितले.

ॲमिकस क्युरी नियुक्त

हे प्रकरण गंभीर असल्याने त्यामध्ये खंडपीठाला मदत करण्यासाठी ॲमिकस क्युरीची गरज आहे. ॲड. नायजेल दा कॉस्ता फ्राईस यांना ॲमिकस क्युरी म्हणून नियुक्त करण्यात येत असून त्यांना शेन कुतिन्हो हे साहाय्य करतील. या जनहित याचिकेत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्यांची माहिती घेऊन फ्राईस हे खंडपीठासमोर सादर करतील व मदत करतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वेलिंगकरांच्या अटकेसाठी गोवा पोलिसांची महाराष्ट्रात शोध मोहीम!

खरी कुजबुज: जीत - मायकल आमने सामने

Saint Francis Xavier पवित्र दर्शनात भ्रष्टाचार; प्रकल्पांमधले पैशे खिशात, जनतेचे पैसे बरबाद केल्याचा भाजप सरकारवर आरोप

Bicholim News: भाडेकरूंची डिचोली पोलिस स्थानकात गर्दी! कार्यक्षेत्रात तपासणी मोहिमेला वेग

'गोवा पोलिस' अंमलीपदार्थांविरोधी गंभीर! 'कोकेन जप्ती'प्रकरणी दिल्ली पोलिसांना करणार सहकार्य

SCROLL FOR NEXT