Goa Accident News Dainik Gomantak
गोवा

Bicholim Accident: 'त्या' कारचालकाला जामीन! दारूच्या नशेत केला होता अपघात; गोवा खंडपीठाकडून सशर्त दिलासा

Bicholim Accident News: डिचोली येथील कार - दुचाकी अपघात प्रकरणातील कारचालक संशयित ओम प्रसाद खंबाल याला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सशर्त जामीन दिला.

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim Nanoda Road Accident Case

पणजी: डिचोली येथील कार - दुचाकी अपघात प्रकरणातील कारचालक संशयित ओम प्रसाद खंबाल याला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सशर्त जामीन दिला. संशयित एक महिन्याहून अधिक काळ कोठडीत आहे तसेच अपघातप्रकरणी तपास पूर्ण होऊन लवकरच आरोपपत्र दाखल केले जाणार आहे, त्यामुळे त्याला जामीन नाकारणे योग्य होणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

गेल्या सप्टेंबरमध्ये पहाटेच्या सुमारास अस्नोडा - नानोडा महामार्गावर कार व दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या टक्करीत प्रतीक कानोळकर व लक्ष्मण मळीक हे दोघे ठार झाले होते तर कारचालक जखमी झाला होता. डिचोली पोलिसांनी कारचालक ओम प्रसाद खंबाल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली होती. एक महिन्याहून अधिक काळ कोठडीत आहे. अपघात झाला तेव्हा कार चालक मद्याच्या नशेत होता व त्यामुळेच त्याच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात होऊन दोघा तरुणांना जीव गमवावा लागला होता. त्यामुळे जामीन दिल्यास त्याला कठोर अटी घालाव्यात, अशी बाजू सरकारी वकिलांनी मांडली.

संशयित ओम प्रसाद खंबाल याला अपघातप्रकरणी अटक झाली आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वी कोणताही गुन्हा नोंद नाही. निष्काळजीपणाबद्दल त्याच्याविरुद्ध आरोप ठेवण्यात आले आहेत. तो न्यायालयाने घातलेल्या अटींचे पालन करण्यास तयार आहे, अशी बाजू त्याच्या वकिलांनी मांडली.

न्यायालयाच्या अटी

न्यायालयाने संशयिताला ५० हजार रुपये जाचमुचलका व तत्सम रकमेचा एक हमीदार सादर करण्याचा तसेच आरोपपत्र दाखल झाल्यावर खटल्यावरील सुनावणीला उपस्थिती लावावी. आरोपपत्र दाखल होईपर्यंत सोमवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत तपास अधिकाऱ्यांसमोर हजेरी लावावी, अशा अटी घातल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pankaj Dheer: महाभारतातील 'कर्ण' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचे निधन, मनोरंजन विश्वात शोककळा

‘त्या’ स्वप्नाला मूर्त स्वरुप येण्यापूर्वीच 'पात्रांव रवी नाईक' यांनी जगाचा निरोप घेतला

'चाणक्य हरपला'! फोंड्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार; माजी मुख्यमंत्र्यांच्या निधनाने सर्वपक्षीय नेत्यांमध्ये शोककळा

Goa Today's News Live: सार्वजनिक सुट्टीमुळे दावर्ली पंचायत निवडणूक रद्द, उडाला गोंधळ

Footprints and Frames: मुंबई ते गोवा मार्गावरील कथा पहा चित्रांमध्ये! नॉस्टेल्जीयाच्या पाऊलखुणा

SCROLL FOR NEXT