Goa Bombay High Court Gomantak Digital Team
गोवा

Goa Bench : तांत्रिक समस्येमुळे विद्यार्थ्याला परीक्षेस अपात्र ठरविणे अयोग्य

गोवा खंडपीठ : परीक्षा घेण्याचे राज्य, केंद्र सरकारला निर्देश

गोमन्तक डिजिटल टीम

काही तांत्रिक समस्येमुळे परीक्षेसाठी वेळेत अर्ज भरता आला नाही म्हणून परीक्षेपासून वंचित ठेवणे तथा परीक्षेसाठी अपात्र ठरवणे योग्य नाही असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने नोंदविले.

तसेच राज्य व केंद्र सरकारला जैव वैद्यकीय संशोधन पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी सक्तीची असलेली मूलभूत परीक्षा याचिकादार रश्मी विजयकुमार व इतरांसाठी 31 मे 2023 किंवा त्यापूर्वी घ्यावी व त्याचा निकाल 7 जून 2023 रोजी जाहीर करण्याचे निर्देश देत ही सुनावणी येत्या 12 जूनपर्यंत तहकूब केली.

जैव वैद्यकीय पदव्यत्तर अभ्यासक्रमासाठी विद्यार्थिनी रश्मी विजयकुमार किंवा इतर विद्यार्थी तांत्रिक समस्येमुळे 29 व 30 एप्रिल रोजी घेतलेल्या परीक्षेला बसू शकलेले नाहीत, त्यांनाही ही संधी द्यावी असे आदेशात खंडपीठाने स्पष्ट केले आहे. पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण (दुरुस्ती) नियमन 2019 नुसार प्रत्येक विद्यार्थ्याने पदव्युत्तर जैव वैद्यकीय संशोधन अभ्यासक्रम 12 जून 2023 पासून सुरू होत आहे त्यासाठी मूळ परीक्षेत पात्र होणे ही अट आहे.

त्यामुळे याचिकादार असलेली विद्यार्थिनी रश्मी विजयकुमार तिने ऑनलाईन परीक्षेसाठी अर्ज करूनही तो पोहोचला नव्हता. त्यामुळे तिला परीक्षेस बसण्यास अपात्र ठरवण्यात आले होते. तांत्रिक कारणामुळे तिला एक वर्ष गमवावे लागणार असल्याने तिने याचिका सादर करून तिचा अर्ज स्वीकारून या परीक्षेस बसण्याचे निर्देश संबंधितांना द्यावेत अशी विनंती केली होती.

याचिकादार रश्मी विजयकुमार हिने 20 मार्च 2023 रोजी परीक्षेचा अर्ज दाखल करण्यासाठी लॉग इन करण्याचा सतत प्रयत्न केला, मात्र ही नोंदणी करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2023 असूनही ती त्यामध्ये यशस्वी झाली नव्हती. तिने ही नोंदणी करण्यात येत असलेल्या अडचणींची माहिती ईमेल पाठवून संबंधितांना दिली होती.

मात्र तरीही तिला तिने नोंदणी केली नसल्याचा संदेश पाठवण्यात आला. तिने अनेकदा प्रयत्न केले, मात्र अधिकाऱ्यांकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याचे, परीक्षेची नोंदणी २१ मार्च 2023 रोजी बंद झाल्याचे तसेच 29 व 30 एप्रिलला होणाऱ्या परीक्षेची तारीख वाढवणे शक्य नाही असे कळवण्यात आले. त्यामुळे अखेरचा पर्याय म्हणून तिने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT