Court Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: प्रेमप्रकरणातून तरुणी गरोदर, युवकावर 'पॉक्सो' दाखल! पीडितेशी केला विवाह, खटल्यातून झाली सुटका

Goa POCSO Case: पीडित मुली व संशयित मुस्ताक अत्तार यांच्यात प्रेमसंबंध होते. ही मुलगी आजारी पडल्याने तिला डॉक्टरकडे नेण्यात आले त्यावेळी ती गरोदर असल्याचे उघडकीस आले.

Sameer Panditrao

पणजी: बलात्कार प्रकरणाचा आरोप असलेल्या संशयित मुस्ताक अत्तार याने पीडितेशी विवाह केल्याने त्याच्याविरुद्ध विशेष जलदगती न्यायालयात (पोक्सो) सुरू असलेला खटला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने रद्दबातल ठरविला.

संशयिताने पीडितेबरोबरचा विवाह नोंदणीचा दाखला व बालकाचा जन्मदाखला न्यायालयात सादर केल्याने हा आदेश दिला. पीडितेला मुलासह स्वीकारल्याने हा खटला बंद करण्याची विनंती करणारा अर्ज संशयिताने खंडपीठात केला होता.

पीडित मुली व संशयित मुस्ताक अत्तार यांच्यात प्रेमसंबंध होते. ही मुलगी आजारी पडल्याने तिला डॉक्टरकडे नेण्यात आले त्यावेळी ती गरोदर असल्याचे उघडकीस आले.

तिच्या पालकांनी याप्रकरणी फातोर्डा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती. ही घटना २०२१ मध्ये घडली. पोलिसांनी संशयित मुस्ताक अत्तार याला अटक केली होती.

मुलगी अल्पवयीन असल्याने अत्तारविरुद्ध विनयभंग, बलात्कार, बाल कायदा तसेच पोक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपासकामावेळी आवश्‍यक पुरावे जमा करून पोक्सो न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते.

आरोपपत्रानंतर त्याला सशर्त जामीन मिळाला होता. या आरोपपत्रावरील सुनावणी न्यायालयात प्रलंबित असताना संशयिताने पीडित मुलीशी विवाह केला व त्याची कायदेशीर नोंदणीही केली. जन्माला आलेल्या बालकालाही त्याने स्वीकारले. त्यामुळे हा खटला रद्द करण्यासाठी त्याने उच्च न्यायालयात अर्ज केला होता.

संशयिताच्या जामीन अर्जावरील सुनावणीवेळी ॲड. विभव आमोणकर यांनी बाजू मांडली. संशयित अत्तारने पीडितेशी ती सज्ञान झाल्यावर विवाह केला तसेच तिच्या बाळालाही स्वीकारले. यावेळी त्याने विवाह नोंदणी केल्याचा दाखला तसेच मुलाचा जन्मदाखला सादर केला. सरकारी वकिलांनीही या अर्जाला विरोध केला नाही. उच्च न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेऊन संशयित व पीडित मुलीच्या हिताच्या दृष्टीने खटल्याची सुनावणीच रद्द केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Nightclub: हडफडेतील अग्नितांडवानंतर बेकायदा क्‍लबचा मुद्दा ऐरणीवर; कळंगुट, बागात जागा मिळेल तेथे क्‍लब, सामान्य नागरिक हैराण!

Horoscope: करिअरमध्ये प्रगतीचे योग! 'या' राशींना मिळेल मोठे यश, वाचा तुमचे भविष्य

Goa Politics: विजय सरदेसाई, अमित पाटकर यांच्यामुळे युती तुटली; आरजीच्या मनोज परब यांचा आरोप

Goa Nightclub Fire: 'आग लागली तेव्हा आम्ही नव्हतो!' लुथरा बंधूंचा लंगडा युक्तिवाद, दिल्ली कोर्टाचा दिलासा देण्यास नकार; 'गोव्याचे उत्तर' ठरणार निर्णायक

Serendipity Arts Festival Goa: कला आणि संस्कृतीचा गोव्यात महासंगम! 12 ते 21 डिसेंबरदरम्यान सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल

SCROLL FOR NEXT