Goa Crime: हुबळीहून गोव्यात आले, वाद पाहून कंडक्टरने खाली उतरवले आणि...! वाचा धारबांदोडा येथील खूनप्रकरणाचा घटनाक्रम

Dharbandora Murder Case: प्रेयसीचे आणखी कोणासोबत प्रेमसंबंध असावेत, या संशयाने पछाडलेल्या प्रियकराने तिला फिरायला जायच्या निमित्ताने बंगळुरूहून गोव्यात आणले आणि तिचा कायमचा काटा काढला.
Dharbandora Murder Case
Dharbandora Murder CaseDainik Gomanatak
Published on
Updated on

मडगाव: आपल्या प्रेयसीचे आणखी कोणासोबत प्रेमसंबंध असावेत, या संशयाने पछाडलेल्या प्रियकराने तिला फिरायला जायच्या निमित्ताने बंगळुरूहून गोव्यात आणले आणि तिचा कायमचा काटा काढला. ही सिनेस्टाईल थरारक घटना प्रतापनगर - धारबांदोडा येथे घडली. मात्र, पोलिसांनी अवघ्या २४ तासांत या प्रकरणाचा छडा लावून संशयिताच्या मुसक्या आवळल्या.

प्रतापनगर-धारबांदोडा येथे जंगलात एका युवतीचा गळा चिरून खून झालेल्या प्रकरणाचा फोंडा पोलिसांनी अल्पावधीतच छडा लावला असून, प्रेमात निर्माण झालेला दुरावा आणि प्रेयसीच्या चारित्र्याच्या संशयावरून प्रियकरानेच प्रेयसीचा खून केल्याचे उघड झाले आहे.

पोलिसांनी या प्रकरणात संशयित संजय केविन एम. याच्या मुसक्या कर्नाटकातील हुबळी येथे आवळल्या. मयत युवतीचे नाव रोशिनी एम. असून ती बंगळुरू येथील एका शाळेत कामाला होती, अशी माहिती प्राप्‍त झाली आहे.

मडगावातील पत्रकार परिषदेत दक्षिण गोव्‍याचे पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांनी याविषयीची माहिती पत्रकारांना दिली. यावेळी त्‍यांच्‍यासोबत फोंड्याचे पोलिस उपअधीक्षक शिवराम वायंगणकर, निरीक्षक विजयनाथ कवळेकर आणि या शोध मोहिमेत भाग घेतलेले अन्‍य पोलिस कर्मचारी उपस्‍थित होते.

पोलिस अधीक्षक वर्मा यांनी दिलेल्‍या माहितीप्रमाणे, संजय हा प्रेयसी रोशिनीला गोवा दर्शनासाठी घेऊन आला होता; पण बसमध्‍येच प्रवासादरम्यान त्‍यांच्‍यात खटके उडू लागले होते. ते दोघेही धारबांदोडा येथे उतरले.

त्‍यानंतर संशयिताने तिच्‍या गळ्‍यावर चाकूने वार करून तिचा खून केला. खुनाच्या घटनेनंतर संजय हुबळीला पळून गेला. तेथून तो बसने मुंबईला जाण्‍याच्या तयारीत होता. त्यापूर्वीच पोलिसांनी त्याला जेरबंद केले. सध्या पोलिस संशयिताची कसून चौकशी करीत असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक वर्मा यांनी दिली.

संशयिताची चौकशी सुरू असून, पुढील तपासात खुनाचे नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. मृत युवती अंदाजे २२ ते ३० वयोगटातील असून, रविवार, १५ जून रोजी प्रतापनगर-धारबांदोडा येथे खुनाची घटना घडली होती.

युवतीचा मृतदेह सापडल्यानंतर फोंडा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या १०३ कलमाखाली हे प्रकरण नोंदविले होते. उपअधीक्षक शिवराम वायंगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विजयनाथ कवळेकर आणि अन्य सहकाऱ्यांनी संशयिताला पकडले.

संजयच्या मनात संशयाची पाल

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, संशयित संजय बेरोजगार होता; पण त्‍याची प्रेयसी रोशिनी काम करत होती. त्यांच्‍यामध्ये गेली पाच वर्षे प्रेमसंबंध होते. मात्र, हल्ली त्यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. संजयला रोशिनीच्या चारित्र्याविषयी संशय होता. त्यामुळेच संशयिताने तिला कायमचे संपविण्याचा निर्धार केला होता. खुनाच्या घटनेनंतर पोलिसांना काही महत्त्वाचे धागेदोरे सापडले होते.

बसमध्ये उडाले वारंवार खटके

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संजय आणि रोशिनी यांच्यात बसमध्ये बसल्यापासूनच वाद सुरू होता. त्यांच्यात वारंवार खटके उडत असल्याने बसमध्येही हा चर्चेेचा विषय बनला होता. अखेर त्यांच्यातील वाद विकोपाला गेल्यामुळे कंडक्टरने त्या दोघांना- प्रतापनगर-धारबांदोडा येथे बसमधून खाली उतरले. त्यानंतर संजयने तिला रात्री दाट जंगलामध्ये नेऊन तिचा खून केला असावा, असा कयास आहे.

बहिणीचे मोबाईल कार्ड

संजय जो मोबाईल वापरत होता, त्यातील सीमकार्ड त्याच्या बहिणीच्या नावावर होते. तो रात्री उशिरापर्यंत आला नाही, म्हणून त्याच्या बहिणीने फोन केला असता, तो कॉल रोशिनीने उचलला आणि तिने आम्ही दोघे गोव्याकडे निघालो असल्याचे सांगितले.

संजयच्या बहिणीचा आक्रोश

संजयला हुबळीहून गोव्यात आणण्यात आले, त्यानंतर लगेचच आरोपीचे वडील, बहीण व इतर नातेवाईक गोव्यात दाखल झाले. संजयला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यासाठी पोलिसांनी स्थानकातून बाहेर काढले, त्यावेळी त्याची बहीण धावत गेली आणि भावाला मिठी मारून धाय मोकलून रडू लागली. यासंबंधी पत्रकारांनी संशयिताचे वडील आणि नातेवाईकांशी संपर्क साधला असता, त्यांनी बोलण्याचे टाळले.

७ दिवसांची कोठडी

या घटनेनंतर संजय आणि रोशिनीचे कुटुंबीय गोव्यात दाखल झाले असून रोशिनीचे शवविच्छेदन बुधवारी करण्यात येणार आहे. संजयला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, त्याला ७ दिवसांची पोलिस कोठडी बजावण्यात आली. बुधवारी त्याला घटनास्थळी नेऊन पोलिस चौकशी करण्याची शक्यता आहे.

Dharbandora Murder Case
Pernem Crime: 'तुला आज दाखवतोच', म्हणत पेडण्यात मुलाने आईवर कोयत्याने केला जीवघेणा हल्ला; मुलाला अटक

१ संजय आणि रोशिनी यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र, रोशिनी सर्वांसोबतच मनमोकळेपणाने वागत असल्याने तिचे हे वागणे संजयला खटकायचे.

२रोशिनीचे आणखी कोणाशी तरी संबंध असावेत, असा संशय वारंवार संजयच्या मनात होता.

३याच संशयावरून त्याने तिला आपण फिरायला जाऊया, असे सांगून बंगळुरू येथून हुबळीत आला आणि तिलाही हुबळीत बोलावून घेतले.

४ राेशिनीला कोणताही संशय येऊ नये, यासाठी एक दिवस ते दोघे हुबळी फिरले.

५दुसऱ्या दिवशी ते आंतरराज्य बसने गोव्याकडे यायला निघाले.

Dharbandora Murder Case
Goa Crime: लग्न करण्यासाठी प्रेमी युगुल कर्नाटकातून गोव्यात आलं; वाद झाला अन् प्रियकराने प्रेयसीचा गळाच चिरला

६ मात्र, या बसमध्येही त्यांचा वाद विकोपास गेला. त्याचा इतर प्रवाशांना त्रास होऊ लागला.

७ अखेर ही बस धारबांदोडा येथे आली असता, कंडक्टरने त्या दोघांना बसमधून उतरविले.

८त्यावेळी रात्री दाट जंगलात निर्जनस्थळी नेऊन संजयने रोशिनीला संपविले.

९ संजयने रोशिनीला संपवायचे, याच इराद्याने सर्व तयारी केली होती. त्याच्याकडे चाकू वगैरे हत्यारे होती.

१० पोलिसांना घटनास्थळी बसचे एक फाटलेले तिकीट सापडले. त्या तिकिटाचे तुकडे जुळविले असता, पोलिसांना धागेदोरे सापडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com