पणजी: आसगाव येथील अल शदाई चॅरिटेबल ट्रस्टच्या कॅथलिन हाउसमध्ये कोणतीही परवानगी न घेता व कागदोपत्री व्यवहार न करता अल्पवयीन मुलांना आसरा दिल्याचे पत्रवजा तक्रार बाल कल्याण समितीने केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने स्वेच्छा दखल घेतली आहे. ॲड. आश्विन भोबे यांची ॲमिकस क्युरी म्हणून नेमणूक केली आहे. या स्वेच्छा याचिकेवरील सुनावणीवेळी अल शदाई चॅरिटेबल ट्रस्टने स्पष्टीकरण करण्यास वेळ मागितल्याने ही सुनावणी दोन आठवडे तहकूब करण्यात आली.
अल शदाई चॅरिटेबल ट्रस्टतर्फे त्यांच्या कॅथलिन हाऊसमध्ये अल्पवयीन मुलांना आसरा देण्यात येतो. आसरा देण्यात आलेल्या मुलांची माहिती किंवा त्यासाठीची पूर्वकल्पना बाल कल्याण समितीला देणे सक्तीचे असल्याने ती दिली जात नाही. जेव्हा या समितीने आसगाव येथे अचानक पाहणी केली, तेव्हा सुमारे ३४ हून अधिक अल्पवयीन मुले सापडली होती ज्यांची माहिती या समितीला देण्यात आली नव्हती. आवश्यक असलेली कायदेशीर प्रक्रिया करण्यात आली नव्हती. त्यामुळे या ट्रस्टला मुलांना व त्यांच्या पालकांना समितीसमोर उपस्थित करण्यास सांगण्यात आले होते. तरीही या ट्रस्टकडून कोणतीच कार्यवाही झाली नाही.
बाल कल्याण समितीने अल शदाई चॅरिटेबल ट्रस्टच्या कॅथलिन हाउसमध्ये अल्पवयीन मुलांना बेकायदेशीरपणे आसरा देण्यात आल्याची माहिती हणजूण पोलिसांना दिली. पोलिसांकडूनही याबाबतीत कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे अखेर समितीने उच्च न्यायालयाला पत्र पाठवून हा प्रकार समोर आणला होता. खंडपीठाने त्याची दखल घेत ट्रस्ट व हणजूण पोलिसांना प्रतिवादी करून नोटीस बजावली होती. आज सुनावणीवेळी ट्रस्टच्या वकिलांनी उत्तर देण्यास दोन आठवड्याची मुदत मागितल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.